तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:36 AM2019-03-05T11:36:02+5:302019-03-05T11:37:43+5:30
नवलनगर येथे जागतिक तापमानवाढ जाणिव व जागृती या विषयावर कार्यशाळा
आॅनलाइन लोकमत
धुळे : तापमानवाढ ही मोठी समस्या असून, ती रोखण्यासाठी वृक्षलागवडीबरोबरच जनजागृतीही महत्वाची असल्याचा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ जळगाव व क्रांतीवीर नवलभाउ कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवलनगर येथे आयोजित ‘जागतिक तापमानवाढ जाणिव व जागृती’कार्यशाळेत वरील सूर उमटला. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.एच. उभाळे होते.
यावेळी बोलतांना प्रा.बी.व्ही.देशमुख (अमळनेर) म्हणाले, वाढणाऱ्या तापमानाला रोखण्यासाठी लिंब, चिंच,वड, पिंपळ, तुळस यासारख्या वृक्षांची लागवड करणे आज काळाची गरज आहे. योग्य पाणी व्यवस्थापन करून मजबूत व टीकाऊ झाडे लावणे गरजेचे आहे.
प्रा.डॉ. व्ही.एम. अघोणे म्हणाले, तापमानवाढ रोखण्यासाठी जनजगाृती व पाण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे.
प्रा.डॉ.सतिष पाटील (दोंडाईचा) यांनी सांगितले की, आज तरूण वर्गाला जागृत राहून तापमानवढ रोखण्यासाठी वेगवेगळ्यास्तरावर कार्य करणे गरजेचे आहे. झाडांची निगा प्रत्येकाने राखावी, तरच तापमानवाढ शक्य आहे. यावेळी प्रा. एच.एम. शेख (कुसुंबा) यांनीही मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. व्ही.एच. उभाळे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, प्रत्येकाने एक झाड लावून त्याची योग्य निगा राखल्यास तापमानवाढीला काही प्रमाणात आळा बसू शकेल.
कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. यू.वाय. गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन मेहूल रामोशी, करिष्मा पारखे, कोमल यादव, यांनी तर आभार गोपाल पाटील यांनी मानले.
यावेळी प्रा. डॉ. जे.एइ. पाटील, दीपाली कदम, दक्षता मदने आदी उपस्थित होते.