‘कोथंबिरी’चे दर भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:35 PM2020-08-22T22:35:20+5:302020-08-22T22:35:43+5:30

पावसाळा असूनही भाज्यांचे दर वाढलेलेच । सर्वसामान्यांच्या खिशाला बसतेय झळ

The price of cilantro skyrocketed | ‘कोथंबिरी’चे दर भिडले गगनाला

‘कोथंबिरी’चे दर भिडले गगनाला

Next

धुळे : पावसाचे दिवस सुरु असूनही सर्वसामन्यांसाठी जीवनावश्यक असणाऱ्या भाज्यांच्या दरात घट होत नसून दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे चित्र शहरातील बाजारपेठेत पहावयास मिळत आहे़ इतर भाज्यांप्रमाणेच कोथंबिरचे दर तर गगनाला भिडले असल्यामुळे सामान्य लोकांकडून कोथंबिरीची खरेदी होताना दिसत नाही़ बटाटे, टमाट्यांसह अन्य भाज्यांचे दर तसे वाढलेले आहे़
लॉकडाऊनचा काळ आणि आताचा अनलॉकचा काळ लक्षात घेता भाज्यांच्या दरात घट होईल असे चित्र पहावयास मिळेल, अशी अपेक्षा असताना मात्र ती पोल ठरली आहे़ लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला विक्रीसाठी वेळेचे बंधन ठेवण्यात आलेले होते़ दुपारी ४ वाजेनंंतर भाजी विक्री बंद होत होती़ त्यामुळे सुरुवातीच्या काळात भाजांचे दर तसे वाढलेलेच होते़ एरव्ही १० रुपये पावशेर मिळणारी भाजी आताच्या या काळात २० रुपयांपर्यंत जावून पोहचली आहे़ त्यात कोबी, गिलके, दोडके, गवार, कांद्याची पात यांचा समावेश आहे़ तर वांगे ३० रुपये पावशेर या दराने विक्री होत आहे़
कोथिंबीर ठरतेय वरचढ
कोथिंबीरचे उत्पादन स्थानिक ठिकाणी होत असल्याने धुळे तालुक्यातून कोथिंबीरचे मोठ्या प्रमाणात आवक होते़ मागणी वाढत असल्याने १५० ते २०० रुपये किलो दराने त्याची विक्री होत आहे़ त्यामुळे सध्या बाजारात कोथिंबीरच्या खरेदीत घट झाल्याचे दिसून येत आहे़ कोथंबिरचे दर हे सर्वाधिक वाढलेले आहे़
अद्रकाची मागणी वाढली
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये़़, यासाठी नागरिकांकडून रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध उपाय- योजना केले जात आहे़ दैनंदिनी वापरात काढ्यासाठी तसेच चहात अद्रकचा वापर वाढल्यामुळे अद्रकची मागणी वाढली आहे़ ३० रुपयाला ५० ग्रॅम अद्रक मिळत आहे़
वटाणे बाजारात दाखल
शहरातील पाच कंदील परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांकडे दोन दिवसांपासून वाटाणा दाखल झाला आहे. पुणे येथून सध्या वाटाण्याची आवक होत आहे. वाटण्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत वाटाणे ८० ते १०० रुपयांप्रमाणे त्यांची विक्री होत आहे. भाव कमी होऊ शकतात अशी अपेक्षा विक्रेत्यांना आहे़ दरम्यान, भाज्यांचे दर हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे घर कसे चालवावे? हा मोठा प्रश्न गृहिणींसमोर निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे़
मागील आठवड्यात ८० ते ९० रुपये प्रति किलो प्रमाणे टोमॅटोची विक्री होती, आता हेच दर १०० रुपयांपर्यंत पोहचले आहे़ तसेच शिमला मिरचीचे भाव दुप्पट झाले आहेत. काही आठवड्यापूर्वी ४० रुपये प्रति किलो असलेल्या शिमला मिरचीचा दर ८० रुपयांवर गेला आहे. गवारच्या शेंगांच्या भावातही वाढ झाली आहे. ८० रुपयांना एक किलो या दराप्रमाणे त्यांची विक्री होत आहे. तसेच चवळीच्या शेंगा देखील भाव खात असून ६० रुपये किलो प्रमाणे त्यांची विक्री होत आहे. मिरची सध्या ४० रुपये किलो प्रमाणे विकली जाते आहे. मागील काही आठवड्यांपासून मिरचीचे भाव स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वालच्या शेंगांची ६० रुपये प्रतिकिलो या दराप्रमाणे विक्री होत आहे तर भेंडी ४० रुपये किलोप्रमाणे विकली जात आहे. तसेच फुलकोबीची ४० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़

Web Title: The price of cilantro skyrocketed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे