सालदारकीला पाऊण लाखाचा भाव फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 09:27 AM2018-04-18T09:27:16+5:302018-04-18T09:27:16+5:30

कापडणे : अक्षय तृतीयेला ठरते शेतमजुरांचे साल, ग्रामीण भागात अजूनही परंपरा कायम

The price of Salarakari Pana Lakhan ruptured | सालदारकीला पाऊण लाखाचा भाव फुटला

सालदारकीला पाऊण लाखाचा भाव फुटला

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी व सालदारांच्या दृष्टीने आखाजी महत्त्वाचा दिवसयाच दिवशी ठरवितात शेतकरी वर्षभरासाठी सालदार यंदा सालाचा दर फुटला पाऊणलाख रूपये 

 

दीपक पाटील। 
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : खान्देशात अक्षय तृतीयेचे जेवढे महत्व धार्मिक आहे. तेवढेच शेतकरी व शेतमजुरांच्या दृष्टीने वर्षभरातील हा  दिवस महत्वपूर्ण मानला जातो. याच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सालदारांची शेतकºयांकडून निवड केली जाते व तडजोडीअंती साल ठरविले जाते. अर्थात वर्षभरातील शेतमजुराच्या कामाचे वेतन ठरते.
बदलत्या काळानुसार शेती व्यवसायातही आमुलाग्र बदल झाले. शेती क्षेत्रात नवनवीन सुधारणा झाली. यांत्रिकीकरण व सोयीस्कर अवजारांची निर्मिती झाल्याने कमीत कमी वेळेत, श्रमात व खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. त्यामुळे पुर्वीसारखे सालदारकीला फारसे महत्व राहिले नाही. शेतकºयाच्या शेतात वर्षभर काम करणाºया सालदाराची निवड ही पद्धत काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, अजूनही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पूर्वापार चालत आलेली सालदार निवडीची परंपरा ग्रामीण भागात अभावाने दिसून येतेच. 
कापडणे येथे सालदार निवड करण्यात आली. दर वर्षाप्रमाणे यंदाही सालदाराच्या वर्षभराच्या मजुरीत तीन ते पाच हजारांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ७० हजार रुपये सालदारकीचा दाम मिळाला होता. यंदा मात्र, एका सालदारासाठी ७५ हजाराचा दाम ठरला.  
सालदार व्यवस्था हळूहळू बंद पडण्याला शेतकºयांसमोरील गंभीर प्रश्नच जबाबदार आहेत. सततचा कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस, उत्पादनात घट, शेतकºयांच्या उत्पादीत मालाला किफायतशीर भावाचा अभाव, वाढती मजुरी, पाणीटंचाई, बैलजोडी व त्यांना लागणाºया चाºयांच्या किंमतीत अव्वाच्या सव्वा झालेली वाढ, विजेचा लपंडाव, महागडी बी-बीयाणे, खते, किटकनाशके यांच्या दरात सतत होणारी वाढ, कमी श्रमात कमी वेळात जास्त मजुरी मिळविण्याकडे मजुरांचा कल, हिस्से वाटणीमुळे जमिनीचे सतत लहान लहान होणारे तुकडे आदी बाबींमुळे शेतकºयांना संपूर्ण वर्षभर सालदार ठेवणे परवडत नसल्याने हळूहळू शेती व्यवस्थेतील सालदार निवड काळाच्या पडद्याआड होत आहे.

 

Web Title: The price of Salarakari Pana Lakhan ruptured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.