धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा वेतन, निवडश्रेणीचा प्रश्न मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:01 PM2018-02-25T12:01:06+5:302018-02-25T12:01:06+5:30
जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची बैठक : उपमुख्यकार्यकारी अधिकाºयांनी दिले आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचा प्रश्न लवकरात लवकर सोडण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यादृष्टीने जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या मागणीनुसार नुकतीच जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी व्यासपीठावर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, गटशिक्षणाधिकारी पी.टी. शिंदे, पी.बी. भिल (साक्री) होते.
यावेळी १२ वर्षे सेवा पूर्ण करणाºया शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व २४ वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी तातडीने लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी समन्वयक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भामरे, राजेंद्र खैरनार, राजेंद्र नांद्रे, राजेंद्र जाधव, विजय पाटील, बापू पारधी, शरद पाटील, विश्वनाथ सोमवंशी, गणेश वाघ, भूपेश वाघ, चंद्रकांत सत्तेसा, ज्ञानेश्वर पवार, शांताराम देवरे व समन्वय समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.