धुळ्यानजिक खाजगी बस ट्रकवर धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:05 PM2019-02-17T12:05:19+5:302019-02-17T12:05:43+5:30

बसमधील एकजण जागीच ठार : ३० जण जखमी, मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद

Private bus rammed into Dhunyanaganj | धुळ्यानजिक खाजगी बस ट्रकवर धडकली

धुळ्यानजिक खाजगी बस ट्रकवर धडकली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भरधाव वेगाने जाणारी खाजगी प्रवाशी प्रवाशी बस रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात एक प्रवाशी जागीच ठार झाला, तर ३० जण जखमी झाले. जखमींपैकी १४ प्रवाशी नेपाळमधील आहेत.  हा अपघात मुंबई -आग्रा महामार्गावरील  हॉटेल रेसिडेन्सी पार्कसमोर शनिवारी पहाटे  चारवाजेच्या सुमारास झाला. याप्रकरणी मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार  खाजगी प्रवाशी  बस  (क्र.एमपी ०९-एफए ८५४७) मुंबई येथून इंदूरकडे भरधाव वेगाने जात होती.  शहरातील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर (क्र.पीबी ०६- व्ही ७५४५) ही बस मागून जोरात धडकली. या भीषण अपघातात बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. 
या अपघातात बसच्या कॅबिनमध्ये बसलेला इरफान शेख सादीक (३५, रा. कल्याण) हा प्रवाशी जागीच ठार झाला. तर इतर ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर जखमींना १०८ रूग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींमध्ये मो.साबीर मो.रफीक (२४, रा. मध्यप्रदेश), रतन बुडा (४९), तनबहादूर बुडा (५६), अजय बुडा (७८), बाने बुडा (३८), लोकबहादूर बुडा (३०), नरवीर बुडा(३०), खमा बुडा(५०), धनराज बुडा (३२), निमराज बुडा (२८), थलासिंग बुडा (६२), बोला बहादूर बुडा (४३) प्रियंका उपाध्यक्ष (२९), आशिष नेमा (३२, रा.इंदूर), दिपेश कुमार (५०, रा.इंदूर), समीम इमाम हसन (२६, रा. बदासर, युपी), हनिष पठान हजी (४८, रा.इंदूर), इद्रिस सादिक शेख (३२, रा. मुबंई), ओमप्रकाश बागडी (३५, रा. खंडवा), प्रविण चव्हाण (३२, रा. सनादर, जि.खरगोन), सुफयान सादीक शेख (२१, रा. मुंबई), कपीलकुमार मंडलई (३७, रा. मुंबई), शबनम शेख सादीक (२५ रा. कल्याण), मेहबान सादीक शेख ४६,रा. कल्याण), गंगाबाई नाईक बंजारा (३८, रा. इंदूर) आदींचा समावेश आहे. 
सर्व जखमींवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Private bus rammed into Dhunyanaganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.