समस्या सुटत नसल्याने आमदारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:07 PM2020-01-01T22:07:31+5:302020-01-01T22:08:03+5:30
मागणी : दखल न घेतल्याने नाराजी
धुळे : साक्रीरोडवरील जलगंगा हौसिंग सोसायटी, जलसिंचन, कालिका सोसायटी अशा नागरी वसाहतीत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी मनपा आयुक्तांसह महापौरांना २ वेळा निवेदन देऊन देखील प्रश्न सुटू न शकल्याने नागरिकांनी अखेर आमदार डॉ़ फारूख शाह यांना साकडे घातले़
जलगंगा हौसिंग सोसायटी, जलसिंचन, कालिका सोसायटीसह अन्य २० ते २५ हौसिंग सोसायटीमध्ये गटारी, रस्ते, पथदिवे नसल्याने नागरिकांना गैरसोय होत आहे़ कॉलनी भागातील रहीवासी शासकीय व निमशासकीय कर्मचारी आहेत़ दरवर्षी नियमितपणे मनपाचा मालमत्ताकर १०० टक्के भरतात़
कॉलनीभागात गटारी नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही़ त्यामुळे घरासमोर डबके साचतात़ परिसरात डासांचा प्रार्र्दुर्भाव होत असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे़
या भागात २० वर्षापुर्वी ४ इंची पाईपलाईन असल्याने मोटार लावल्याशिवाय नळाला पाणी येत नाही़ त्यामुळे नागरिकांना दहा दिवसानंतर पाणी पुरवठा होतो़ परिसरात मनपाचे अनेक भुखंड, ओपन स्पेसवर वॉल कंपाऊंड, पेव्हर ब्लॉक बसविणे, वृक्ष लागवड करणे, जेष्ठ नागरिकांकरीता बेैठक व्यवस्था पुरविण्यात यावे अशी मागणी हरीचंद्र लोंढे, गोपीचंद्र पांडव, जी़ एल़ वाघ, बी़ डी़ सुर्यवंशी, बी़ आऱ पाटील, सुधाकर महाले,सतिष माळी, सुभाष पाटील, भटू सोनवणे, बी़बी़पाटील, वामन नवसारे आदींनी केली आहे़