सामाजिक कार्याचा वसा जोपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:49 PM2018-12-31T12:49:20+5:302018-12-31T12:50:41+5:30

कुटूंबियांच्या भावना : राजकीय पार्श्वभूमी नसतांना मिळाले उपमहापौरपद

To promote the social work fat | सामाजिक कार्याचा वसा जोपासणार

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करत आज महापालिकेचे एक उच्च पद कुटूंबाला मिळाले याचा आनंद व अभिमान आहे़ पण पद मिळाले तरी सामाजिक कार्याचा वसा कायम ठेवू, अशा भावना उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या कुटूंबियांनी व्यक्त केल्या़
यंदाच्या महापालिका निवडणूकीत निवडून येत कल्याणी अंपळकर यांच्या माध्यमातून अंपळकर कुटूंबाचा प्रथमच राजकारणात प्रवेश होत आहे़ राजकीय पार्श्वभूमी नसतांना मिळालेले उपमहापौर पद ही कुटूंबासाठी अभिमानाची बाब असल्याचे कुटूंबिय सांगतात़, तसेच पक्षाचे आभार मानतात़ कल्याणी अंपळकर यांच्या कुटूंबात त्यांचे पती सतिश अंपळकर, मुले सुजाता व मुलगा सुहास (कुस्तीपटू), दीर गजेंद्र अंपळकर, जाऊ अश्विनी अंपळकर, सासू भागुबाई अंपळकर यांचा समावेश आहे़ कल्याणी अंपळकर यांचे माहेर नागपूर येथील आहे़ कौटुंबिक जबाबदारी सांभाळतांनाच सामाजिक कार्याचा वसा कायम जोपासत राहणार असल्याचे कल्याणी अंपळकर सांगतात़ अंपळकर कुटूंबियांनी १९९५-९६ मध्ये डॉ़ सुभाष भामरे यांच्या मदतीने दुग्धव्यवसाय सुरू केला होता़
त्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली़ त्यामुळे ते डॉ़ सुभाष भामरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात़ अंपळकर कुटूंबियांच्या सध्या तीन ठिकाणी दुध डेअरी, हॉटेल, व्यायामशाळा आहेत़ या माध्यमातून ते प्रभागात नेहमीच विकास कामे करत असतात़ उपमहापौर पद मिळाले तरी नागरिकांमध्ये मिसळत राहून त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार आहे़ शहर विकासात योगदान देण्याची संधी मिळाल्याने अंपळकर कुटूंबाचा उत्साह व्दिगुणित झाला आहे़

माझ्या सुनेला उपमहापौर पद मिळणे ही आमच्या कुटूंबासाठी अभिमानाची बाब आहे़ आमचे कुटूंब अत्यंत कष्टातून व गरिब आर्थिक परिस्थितीतून वर आले असल्याने सामाजिक कार्याची ओढ आहे़
-भागुबाई अंपळकर, उपमहापौरांच्या सासू


आमच्या कुटूंबाला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज महापालिकेचे उच्चपद मिळाले आहे़ या संधीचे सोने करू व शहराच्या विकासात अधिक योगदान देण्यासाठी प्रयत्नशिल राहू़
-सतीश अंपळकर,
उपमहापौरांचे पती


राजकीय पार्श्वभूमी नसतांना मिळालेल्या या संधीमुळे कुटूंबाला अभिमान आहे़ सामाजिक कार्यात आम्ही नेहमीच कार्यरत राहिलो असून तसेच प्रयत्न भविष्यात कायम ठेवू व विकासावर भर देऊ़
-गजेंद्र अंपळकर,
उपमहापौरांचे दीर

Web Title: To promote the social work fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे