भाजपतर्फे गुंडगिरीला प्रोत्साहन, हा घ्या संभाषणाचा मोठा पुरावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:17 PM2018-11-26T23:17:22+5:302018-11-26T23:18:06+5:30

भाजपचे येथील आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत माहिती

Promotion of bullying by BJP, this is a big proof of the conversation | भाजपतर्फे गुंडगिरीला प्रोत्साहन, हा घ्या संभाषणाचा मोठा पुरावा 

भाजपतर्फे गुंडगिरीला प्रोत्साहन, हा घ्या संभाषणाचा मोठा पुरावा 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  : आपल्यासह कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करणाºया विनोद थोरातला भाजपच्या मंत्र्यांसह पदाधिकाºयांची फूस असून पक्षातर्फे गुंडगिरीला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप भाजपचे येथील आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केला. त्या पुष्ट्यर्थ त्यांनी पोलीस अधिकारी व नागरिक यांच्यात झालेल्या संभाषणाची ध्वनिफीतही माध्यमांच्या प्रतिनिधींना उपलब्ध केली. याचवेळी मनसेचे शहराध्यक्ष डॉ.मनिष जाखेटे यांनी महापालिका निवडणुकीत लोकसंग्रामला विनाशर्त पाठिंबा दिल्याची माहिती दिली. 
आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी विनोद थोरात याच्याविरूद्ध आझादनगर पोलिसांत हेमा गोटे यांच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी थोरात यास चाळीसगाव येथून त्याच्या नातेवाईकाच्या घरून अटक केली. येथे आणून त्यास मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या लॉकअप ठेवण्यात आले होते. त्याचदिवशी त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. 
या संदर्भात आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संभाषण ध्वनिफीती (सीडीआर)ची मागणी केली असल्याचेही आमदार गोटे यांनी यावेळी सांगितले.  गुन्हा दाखल झाल्यानंतर थोरात फरार झाला. तो इकडे-तिकडे लपत फिरत होता. शहरातील पोलीस यंत्रणा त्यास शोधण्याचा बहाणा करीत होती. त्यामुळे  आपणास पोलिसांना इशारा दिला. आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पोलिसांनी थोरात यास चाळीसगाव येथून अटक करून मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले होते. दुसºया दिवशी कोर्टात हजर केल्यानंतर त्यास जामीन मंजूर करण्यात आला होता. 
पत्रपरिषदेवेळी आमदार गोटे यांनी दिलेल्या ध्वनिफीतीतील पोलीस अधिकारी व नागरिक यांच्यातील संवाद असा : 
नागरिक : मिळाला का? 
पोलीस अधिकारी : मग आणला ना, टाकला त्याला मोहाडी पोलीस ठाण्यात लॉकअपला. 
नागरिक  : कुठे मिळाला, 
पोलीस अधिकारी- चाळीसगावला, त्याच्या बहिणीकडे होता.
नागरिक : काय म्हणत होता?
पोलीस अधिकारी : काय म्हणेल, त्याचा कॉन्टॅक्ट सुरू होता  गिरीष महाजन, जयकुमार रावल, डॉ.सुभाष भामरे, हिरामण गवळी, नाना कर्पे यांच्याशी. तो सांगत होता मी सर्वांशी कॉन्टॅक्टमध्ये होतो. मला सर्व माहिती कळत होती.
नागरिक : अजून कोणाचा फोन त्याला?
पोलीस अधिकारी : आला होता ना भिकन वराडेंचा. मग त्याच्याकडून फोन घेऊन दिला स्वीचआॅफ करून. 
प्रभाग ९ मधील मनसे उमेदवाराच्या समर्थनार्थ हेमा गोटे यांची माघार, मात्र प्रभाग ५ मधून उमेदवारी कायम 
४महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या महानगर शाखेने या महापालिका निवडणुकीत आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वात लढणाºया लोकसंग्राम पक्षाला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पक्षाचे शहराध्यक्ष डॉ.मनिष जाखेटे यांनी त्याबाबत या पत्रपरिषदेत माहिती दिली. समविचाराच्या आधारावर हा पाठिंंबा जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अनिल गोटे, लोकसंग्रामचे अध्यक्ष तेजस गोटे, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश मोरे, निवडणूक प्रमुख योगेश मुकुंदे आदी उपस्थित होते. 

Web Title: Promotion of bullying by BJP, this is a big proof of the conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे