मालमत्ता थकबाकीदारांना आता सतराची ‘डेडलाईन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:11 PM2019-03-05T13:11:17+5:302019-03-05T13:11:39+5:30

महापालिका : वेळोवेळी देण्यात आली होती सूट, पथकही सज्ज

Property deadline for deadline now! | मालमत्ता थकबाकीदारांना आता सतराची ‘डेडलाईन’!

मालमत्ता थकबाकीदारांना आता सतराची ‘डेडलाईन’!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेकडे मालमत्ता कराच्या मागणीपेक्षा दुप्पट थकबाकीचे प्रमाण आहे़ हे प्रमाण दरवर्षी कमी अधिक प्रमाणात सारखेच असते़ यंदाच्या वर्षी २४ कोटींची मागणी असून ४२ कोटींची थकबाकी असल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली़ थकबाकीदारांसाठी १७ मार्च रोजी लोकअदालत होणार आहे़ यात होणाºया तडजोडीनंतरच संबंधितांवर कारवाईचे स्वरूप प्राप्त होईल, अशी एकंदरीत स्थिती आहे़ 
गेल्या काही महिन्यांपासून शहराचा वाढणारा विस्तार लक्षात घेता मालमत्ता थकबाकीदारांची संख्या सुध्दा वाढत आहे़ सध्या शहरात सुमारे ८० ते ९० हजारांवर मालमत्ताधारक आहेत़ त्यातील बहुतांश मालमत्ताधारकांनी आपल्याकडील कराचा भरणा महापालिकेत जमा केलेला नाही़ तर बºयाच जणांनी मालमत्तेची नोंद सुध्दा केलेली नसल्याचे समोर येत आहे़ थकबाकीची रक्कम त्यांनी महापालिकेकडे का जमा केली नाही, वसुली करण्यासाठी कोणी गेलेच नाही का, अशा विविध बाबींच्या माहितीचे संकलन करण्याचे काम सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यात साधारणपणे १० हजारांपासून पुढे असलेल्या थकबाकीदारांची माहिती संकलित केली जात आहे़ विशेष म्हणजे काहींनी तर लाखाचाही टप्पा ओलांडलेला आहे़ यासाठी महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी सुट देखील देण्यात आली आहे़ 
कराचा भरणा करा
मार्च महिना सुरु झाल्यामुळे केवळ ‘कराचा भरणा करा, जप्ती टाळा’ असे आवाहन करत आहे़ पण अपेक्षित प्रमाणात त्याचा उपयोग होत नसल्याने आता कारवाईचे सत्र लवकरच उपासण्याचे धोरण आखण्यात येण्याची शक्यता आहे़ त्यासाठी प्राथमिक स्तरावर तयारी देखिल झाली असून थकबाकीदारांचा शोध सुरु झाला  आहे़ 
थकबाकी वसूल करायची असल्याने त्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी देखिल लवकरच होणार आहे़  यासाठी विशेष पथकाची नियुक्ती महापालिका प्रशासनाकडून केली जाणार आहे़ विशेष म्हणजे १० हजारांवर रक्कम असल्यास लिपिक वर्गीय कर्मचारी कारवाई करतील आणि २५ हजारावर रक्कम थकली असल्यास त्या भागाचे निरीक्षक कारवाई करतील असे मागील काही वर्षापुर्वी ठरविण्यात आले होते़ त्याचीही अंमलबजावणी आता होऊ शकते़ तसेच या पथकात एक अधिकारी आणि सोबत काही कर्मचारी राहु शकतात़ त्यांनी थकबाकीदारांकडून वसुली करावी, अशा काही सूचना त्यांना देण्यात येऊ शकतात़ 
पोलिसांची मदत शक्य
थकबाकीदारांकडून वसुली सुरु असताना काही अडचणी आल्यास पोलिसांची मदत देखिल घेण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे़ यासाठी आवश्यक तो सोपस्कारही मार्गी लावण्यात आलेला आहे़ दरम्यान, महापालिकेत भरणा करण्यासाठी नागरिकांची वर्दळ सुरु झाली असल्याने काऊंटर देखिल वाढविले जावू शकतात असे सांगण्यात आले़ 
दरम्यान, या महिन्यातच शास्ती माफी संदर्भात थकबाकीदारांना दरवर्षाप्रमाणे यंदाही सवलत देण्यात आली होती़ या सवलतीचा अनेकांनी लाभ घेतला आहे़ सध्या सवलतीचे टप्पे सुरु आहेत़ असे असलेतरी लोकअदालतमध्ये थकबाकीदारांचा प्रश्न बºयापैकी मार्गी लागू शकतो़ 
लोकअदालत अंतिम पर्याय
शहरातील मालमत्ताधारकांची संख्या लक्षात घेता एका वर्षासाठी सुमारे २४ कोटी रुपयांची मागणी महापालिकेची आहे़ त्या तुलनेत सुमारे ४२ कोटी रुपयांची थकबाकी आहे़ शास्तीच्या माफीसाठी शंभर टक्के सूटमधील योजनेत थकबाकीदारांनी सहभाग नोंदविला आणि साडेतीन कोटी रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला़ 
थकबाकीदारांना वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या पध्दतीने सूट देण्यात आली आहे़ आता १७ मार्च रोजी लोकअदालत आहे़ यामध्ये देखील थकबाकीदारांना प्राधान्य देऊन सूट देण्यात येऊ शकते़ तडजोड करुन मालमत्ता कराचा भरण्यासाठी एक प्रकारे थकबाकीदार मालमत्ताधारक यांना प्रशासनाकडून संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे़ 
वसुली विभागात सध्या स्वॅप मशिन उपलब्ध करुन दिल्यामुळे त्याचाही लाभ अनेक जण घेत आहेत़ 
इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाईन भरणा करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आलेले आहेत़ 
मार्च महिना सुरु असल्याने मालमत्ता आणि पाणीपट्टी भरण्याºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़

Web Title: Property deadline for deadline now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे