दोंडाईचा शहरासाठी १७७ कोटींच्या कामांचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:00 PM2018-02-24T12:00:17+5:302018-02-24T12:00:17+5:30
नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात बैठक
नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : शहरातील नागरिकांना विविध मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी मुंबई येथे नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे १७७ कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने झालेल्या या बैठकीत मंत्री पाटील यांनी प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
शहराची वाटचाल स्मार्ट सिटी कडे वाटचाल आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजितसिह पाटील यांचा दालनात रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांचा उपस्थितीत बैठक झाली. मंत्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निधी मंजूर करण्याचे संकेत दिले आहेत.
न.पा.आस्थापना, नगरपालिका शाळा सुविधा, आरोग्य केंद्र्र, शौचालय, वाढीव पाणीपुरवठा, भुयारी गटार, नागरी दलित सुधार योजना, प्रशासकीय इमारत वाढीव निधी, मागील थकीत वीज बिल अनुदान मिळण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. पालिका इमारतीसाठी ४ कोटी ५० लाख वाढीव अनुदान लवकरच मंजूर होणार आहे. तत्कालीन सत्ताधाºयांच्या काळात थकलेले १ कोटी १२ लाख रुपयाचे अनुदानासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. नागरी दलित सुधार योजनेसाठी ४ कोटी वाढीव अनुदान प्रस्ताव सादर केला.