विरोधी पक्ष नेत्यास अपात्र करण्याचा प्रस्ताव विचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 10:59 PM2020-09-08T22:59:53+5:302020-09-08T23:00:05+5:30
पत्रकार परिषद : जि़ प़ अध्यक्षांची माहिती
धुळे : जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे यांच्याकडून बदनामी होत आहे़ बेजबाबदार विधान ते करीत असल्यामुळे त्यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असून त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे त्यांना अपात्र करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे़ अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
भाजपकडे केली होती तिकिटाची मागणी - पोपटराव सोनवणे हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहे़ संस्थेप्रती काही दायित्व असणं याची जाणीव त्यांना पाहीजे़ परंतु जिल्हा परिषदेचे कामकाज नीटपणे समजून न घेता अधिनियमांचा अभ्यास न करता त्यांना केवळ प्रसिध्दीची नशा चढली आहे़ त्यांनी जि.प. निवडणुकीत भाजपकडून तिकीट मागितले होते.़ पण, त्यांना पक्षाने तिकीट नाकारले़ यामुळे व्यक्तीद्वेषातून व नैराश्यातून ते आरोप करीत असल्याचा आरोप जि.प. अध्यक्ष तुषार रंधे यांनी केला.
कोट - यासंदर्भात पोपटराव सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी अपक्ष उमेदवार असलोतरी महाविकास आघाडीचा नेता म्हणून माझ्याकडे पत्र आहे़ ते मी प्रशासनाला सादर केले आहे़ मी त्यांच्याच कागदपत्रांच्या आधारावर आरोप करीत आहे़ मी केलेल्या आरोपांवर ते बोलत नाही़ विकास कामाला माझा विरोध नाही़ ते ज्या पध्दतीने सध्या हाताळत आहेत त्याला माझा विरोध आहे़