‘बहिणींना पैसे देण्यापेक्षा अब्रूचे रक्षण महत्त्वाचे’; खासदार शरद पवार यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 07:45 IST2024-09-16T07:38:49+5:302024-09-16T07:45:47+5:30
शेतकरी मेळाव्यात बोलताना खा. पवार यांनी केंद्र आणि राज्य शासनावर जोरदार टीका केली.

‘बहिणींना पैसे देण्यापेक्षा अब्रूचे रक्षण महत्त्वाचे’; खासदार शरद पवार यांचा टोला
शिंदखेडा (जि. धुळे) : एकीकडे बहिणींना १५०० रुपये देण्यात येत आहेत आणि दुसरीकडे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. बहिणींना पैसे देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचविणे गरजेचे आहे. याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे, अशी टीका राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे खासदार शरद पवार यांनी रविवारी येथील शेतकरी मेळाव्यात केले.
येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना खा. पवार यांनी केंद्र आणि राज्य शासनावर जोरदार टीका केली.
आ. पटेल यांच्या भेटीने भुवया उंचावल्या
खासदार शरद पवार हे सकाळी नऊ वाजता शिरपूर विमानतळावर आले असता त्यांचे स्वागत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह भाजप आमदार अमरीश पटेल हेही आले हाेते.
शरद पवार यांनी त्यांना बघताच तुम्ही माझ्या स्वागताला कसे काय आलात? अशी मिश्कीलपणे विचारणा केली. त्यावर पटेल यांनी देखील हसत हसत ‘साहेब पारिवारिक संबंध वेगळे आणि पक्ष आपल्या जागी’, असे सांगितले. त्यानंतर दाेघांमध्ये बाेलणे झाले. मात्र यावरून चांगलीच चर्चा रंगली हाेती.