निदर्शने, थाळीनाद करत शासनाचा निषेध
By admin | Published: January 9, 2017 11:27 PM2017-01-09T23:27:02+5:302017-01-09T23:27:02+5:30
नोटाबंदीला विरोध : कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या पदाधिका:यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणला
धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाला दोन महिने पूर्ण झाले असले तरी सर्वसामान्यांचा त्रास कमी झालेला नाही. त्याविरोधात सोमवारी जिल्हाभरात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतर्फे निदर्शने, रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. या वेळी पदाधिका:यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणला होता.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतर्फे ‘धरणे’
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी पदाधिका:यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की नोटाबंदीच्या निर्णयाला सुरुवातीला राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीने पाठिंबा दिला होता. परंतु, आता दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही. दररोज नवनवीन घोषणा होत आहेत. परिणामी, सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या निर्णयामुळे अनेकांना कामावरून कमी करून टाकण्यात आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वास्तविक, पंतप्रधान मोदी यांनी 50 दिवसांनंतर भ्रष्टाचार, दहशतवाद मुक्त व काळा पैसा मुक्त देश होईल, अशी घोषणा केली होती. परंतु, अद्याप तरी ही घोषणा पूर्ण झालेली नसल्यामुळे हे आंदोलन केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, महिला जिल्हाध्यक्षा जयश्री अहिरराव, महापौर कल्पना महाले, उपमहापौर उमेर अन्सारी, मीनल पाटील, सभागृह नेते कमलेश देवरे, नाशिकस्थित म्हाडाचे सभापती किरण शिंदे, जि.प. सदस्य किरण पाटील, राष्ट्रीय सेवा दलाचे अध्यक्ष नंदू ऐलमामे, संजय वाल्हे, अंकुश देवरे, चित्तरंजन कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा दलाचे अध्यक्ष नंदू येलमामे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कॉँग्रेसच्या महिला पदाधिका:यांनी तहसील कार्यालयासमोर सकाळी अर्धा तास थाळीनाद आंदोलन केले. यानंतर तहसील कार्यालयापासून मोर्चा काढत तो जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी धुळे शहर महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा तथा नगरसेविका योगीता पवार, गायत्री जयस्वाल, नाजमिन शेख, शोभा जाधव, संगीता देसले, विमलताई बेडसे, प्रभादेवी परदेशी, वासंतीबेन यादव, संध्याताई चौधरी, रोशन पिंजारी, निर्मला पाटील, सुमन मराठे, नीलेश काटे, युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, साबिर शेख, जावेद शाह, मोहसीन तांबोळी, राहुल काटे, हर्षल पाटील, राहुल काटे, महेश कालेवार व महिला कार्यकर्ते उपस्थित होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दोन महिने झाली तरी सर्वसामान्यांना त्रास होत असल्यामुळे कार्यकत्र्यानी नाराजी व्यक्त केली.