धुळे येथे शाहीर कलावंताचे मानधनासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 04:11 PM2018-11-22T16:11:10+5:302018-11-22T16:12:28+5:30
अर्धातास सुरू होते आंदोलन, सीईओंशी विविध विषयांवर केली चर्चा
आनलाइन लोकमत
धुळे : गेल्या तीन महिन्यांपासून थकीत असलेले मानधन मिळावे, वृद्ध कलावंताच्या मानधनात वाढ करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे आज दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
राज्य शासनातर्फे वृद्ध कलावंताना मानधन दिले जाते. मात्र हे मानधनही वेळेत मिळत नाही. कलावंताच्या बॅँक खात्यावर आॅनलाइन मानधन जमा होईल असे सांगण्यात येते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील वृद्ध कलावंताना मानधन मिळालेले नाही. तसेच नुकतेच जिल्हयातील काही कलावंताची मानधनासाठी निवड केली. मात्र कोणकोणत्या कलावंताची निवड केली आहे, ते देखील सांगतिले जात नाही. शासन प्रतिवर्षी केवळ ६० कलावंताचीच मानधनासाठी निवड करते. ती मर्यादा ३०० पर्यंत असावी. तसेच मानधन १५०० रूपयांवरून ५ हजार रूपये करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली.
आपल्या मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या सदस्यांनी आज दुपारी ठिय्या आंदोलन केले. जवळपास अर्धातास हे आंदोलन सुरू होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन हे दालनात आल्याबरोबरत त्यांनी या कलावंताशी चर्चा केली. यावेळी समाज कल्याण अधिकारी हर्षा बडगुजर यादेखील उपस्थित होत्या.
ठिय्या आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष अनिल जगताप, महासचिव नाना वाघ, संजय सोनार, दीपक महाराज, तुका बापू, हिंमत पाटील, वेडूसिंग गिरासे, मुरलीधर महाराज यांच्यासह ३०-४० कलावंत उपस्थित होते.