आधार प्रमाणीकरण सुविधा उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:25 PM2020-05-08T22:25:27+5:302020-05-08T22:25:52+5:30

जिल्हा बँक : म़ फुले कर्जमुक्ती योजना

Provide Aadhaar authentication facility | आधार प्रमाणीकरण सुविधा उपलब्ध करा

आधार प्रमाणीकरण सुविधा उपलब्ध करा

Next

धुळे : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जप्राप्ती सभासदांचे आधार प्रमाणीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, जेणेकरुन कर्जमुक्तीचा लाभ होवून नवीन हंगामात पीक कर्ज मिळू शकेल़ सभासदांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तत्पर असल्याचे धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे व्यवस्थापक जी़ एऩ पाटील यांनी कळविले आहे़
त्यात प्रामुख्याने बँकेकडे इन्फ्रारेड थर्मामिटर उपलब्ध असून त्याद्वारे स्कॅनिंग करुन शेतकरी सभासदांची तपासणी करुन घेण्यात येईल़ आधार प्रमाणीकरणासाठी येणाऱ्या सभासदांना सोशल डिस्टन्सिंगने विशिष्ठ अंतरावर उभे करुन कामकाज केले जाईल़ सॅनेटायझरची व्यवस्था करण्यात येईल़ दररोज ठराविक गावातील शेतकऱ्यांना बोलाविण्यात येईल़ त्यांचे सुक्ष्म नियोजन आणि नियंत्रण बँकेच्या स्तरावर करण्यात येईल़ अशा प्रकारची विशेष काळजी घेऊन कामकाज करण्यास तयार आहे़
योजनेच्या सभासदांचे आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन कर्जमुक्तीच्या रकमा देणेबाबत बँकेने उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळसाहेब पाटील, आदिवासी विकास मंत्री के़ सी़ पाडवी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे़ तसेच अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, शिरीष नाईक, राजेश पाडवी यांनीही लक्ष द्यावे अशी मागणी बॅकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, सीईओ धिरज चौधरी यांनी केली़

Web Title: Provide Aadhaar authentication facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे