सुविधा पुरवा अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:23 PM2019-07-03T22:23:33+5:302019-07-03T22:23:56+5:30

समस्याग्रस्त जाधवनगरवासीयांचा इशारा : शिंदखेडा मुख्याधिकाºयांना दिले मागण्यांचे निवेदन

Provide convenience otherwise the rapid movement | सुविधा पुरवा अन्यथा तीव्र आंदोलन

जाधव नगरमध्ये समस्यांची पाहणी करताना मुख्याधिकारी अजित निकत, भिला पाटील, सुनील चौधरी, मीरा पाटील, दीपक अहिरे, उदय देसले व परिसरातील नागरिक.

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : वीस वर्षांपासून अस्तित्त्वात आलेल्या प्रभाग १३ मधील  जाधव नगर हे तत्कालीन ग्रामपंचायत व नगरपंचायत मार्फत देण्यात येणाºया मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या येथील राहिवासी नागरिकांनी  नगर पंचायतीत धाव घेऊन मुख्याधिकाºयांंना जाब विचारला. यावेळी नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करत तत्परतेने सुविधा पुरवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
याप्रसंगी रहिवाशींनी उपस्थित नगरसेवकांसमोर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी मुख्याधिकारी अजित निकत यांना मागणीचे निवेदन दिले. उपनगराध्यक्ष भिला पाटील, विरोधी गटनेते नगरसेवक सुनील चौधरी, नगरसेविका मीरा पाटील, नगरसेवक दीपक अहिरे, उदय देसले आदी उपस्थित होते. 
यावेळी निवेदनाची प्रत नगराध्यक्षा रजनी वानखेडे, प्रभाग १३ मधील नगरसेविका मीरा पाटील, विरोधी पक्ष नेते सुनील चौधरी यांना देण्यात आली. यावेळी मागण्यांची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
मुख्याधिकारी निकत व उपनगराध्यक्ष भिला पाटील यांनी त्वरित जाधव नगरात गटारी, काँक्रीट रस्ते, खुल्या जागेत सुशोभीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदनात म्हटले आहे की, वीस वर्षापासून जाधव नगर हे रहिवासी वस्ती अस्तिवात आहे. पण पंधरा वर्षापासून समस्यांची मागणी करीत आहोत. 
जाधव नगर मधील रहिवासी वेळोवेळी आपले नगरपंचायत कर भरत असतात. तरीही रस्ते, गटारी या मुलभूत समस्येपासून रहिवासी वंचित आहेत. अनेकवेळा निवेदन देवून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात विविध योजने अंतर्गत विकासाची कामे सुरु आहे. यात जाधव नगरकडे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. 
      तुम्हास देण्यात येत असलेले हे निवेदन शेवटचे समजून आमच्या मागणीची तातडीने दखल घ्यावी. अन्यथा आपल्या नगर पंचायत कार्यालयासमोर आम्ही रहिवासी पुरुष, महिला यासह आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबिण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदन देते वेळी मोहन परदेशी, किशोर सोनवणे, सुनील पाटील, अतुल पाटील, जितेंद्र मेखे, पंकज शाह, मिलिंद पाटील, भरत बोरसे, कामिनी बोरसे, कल्पना मेखे, सुनंदा चौधरी, सुवर्णा नेरपगार, उज्वला मेखे, ज्योती खोंडे, पवार यांच्यासह मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.
मुख्याधिकाºयांनी पाहणी करुन दिल्या सूचना
पावसामुळे जाधव नगरमध्ये झालेल्या रस्त्यांची दयनीय अवस्था याविषयी राहिवश्यांनी आपल्या संतप्त भावना मुख्याधिकारी यांच्या जवळ व्यक्त केल्या यांची  मुख्याधिकारी निकत यांनी ताबडतोब दखल घेत जधावनगर मधील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी  बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, उपनगर अध्यक्ष भिला पाटील, नगरसेविका मीरा पाटील , प्रवीण माळी आदी उपस्थित होते. यावेळी निकत यांनी  बांधकाम अभियंता व कर्मचारी यांना सूचना करत लगेच रस्त्यावरची काळी माती काढून मुरूम टाकण्यास सांगितले.

Web Title: Provide convenience otherwise the rapid movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे