तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:04 PM2019-06-21T23:04:35+5:302019-06-21T23:05:45+5:30

परिपत्रक वाचन : मालपूरच्या मेळाव्यात शेतकऱ्यांची मागणी

Provide immediate crop loan | तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करा

dhule

Next

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील सेंट्रल बँकेत सुलभ पीक कर्ज अभियान अंतर्गत सुलभ पीक कर्ज मेळावा घेण्यात आला. यात पात्र लाभार्थ्यांना त्वरित पीक कर्ज उपलब्ध करुन देणे अभिप्रेत असल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांना पीक कर्ज व शेती सुधारण्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी बँकेत तसेच विविध कार्यकारी सोसायटीत अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. शेतकरी कंटाळून मेटाकुटीस येतात. तर काही ठिकाणी दलालांना हाताशी धरल्याशिवाय कर्जप्राप्ती होत नाही.
यासाठी शासनाने एक परिपत्रकच काढले असून पात्र शेतकºयांना त्वरित कर्ज उपलब्ध होण्यासाठी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ग्रामीण तालुका व जिल्हा पातळीवर समित्यांचे देखील गठन करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमुद आहे.
मालपूर येथील सेंट्रल बँकेच्या शाखेच्या या अभियान अंतर्गत मेळावा घेवून परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. यात चालू वर्षीचा खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी शेतकºयांना पीक कर्जाची तात्काळ उपलब्धता करा असे सांगण्यात आले. अन्वये महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजने अंतर्गत निर्धारीत केलेल्या अटीनुसार पात्र थकबाकीत असलेल्या कर्जदार शेतकºयांना कर्जमाफी दिलेली असल्याने असे शेतकरी पुन्हा कर्ज घेण्यास पात्र झालेले आहेत. तरी अशा शेतकºयांनी देखील बँकेकडे कर्ज मागणी करावी. जास्तीत जास्त शेतकºयांना तात्काळ कर्ज द्या, नियमित कर्ज परतफेड करणाºया त्वरित पीक कर्ज वाटप करा, नव्याने सभासद झालेल्या शेतकºयांनाही लाभ द्यावा, अशा या योजनेची उद्दिष्टे आहेत.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपककुमार होते. कृषी अधिकारी स्वप्नील पाटील, तलाठी बी.एस. चव्हाण, समन्वयक अशोक सूर्यवंशी, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव रवींद्र पाठक, देविदास पद्भोर, सरपंच मच्छिंद्र शिंदे, रोखापाल जे.एस. निकुम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या मेळाव्याला मालपूर, सुराय, अक्कलकोस, कर्ले, देवी, सतारे, वाडी, रेवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Provide immediate crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे