साक्री ग्रामीण रूग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:48 PM2020-05-04T22:48:10+5:302020-05-04T22:48:26+5:30
निवेदन : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : साक्री ग्रामीण रूग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे यासह तालुक्यातील विविध समस्या संदर्भात कॉग्रेस पक्षातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेवून चर्चा केली़
माजी खासदार बापू चौरे, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार डी़ एस़ अहिरे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य धीरज अहिरे यांचा शिष्टमंडळात समावेश होता़
कोरोनाच्या लढ्यातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य आणि पोलिस, सफाई कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक केले़ तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले़ पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आयुष वैद्यकीय अधिकारींचे पद त्वरीत भरावे, एक्स-रे स्टॅबिलायझर उपलब्ध करुन द्यावे, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच तपासणी नाक्यांवर थर्मल स्कॅनर मशीन, सॅनिटायझर, पीपी ई-कीटचा पुरवठा करावा, मालेगावच्या रस्त्यांची कडक नाकेबंदी करावी, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, सरकारी कामांवरील मजुरांची परवानगी येथील अपर तहसीलदार क्षेत्रानुसार पिंपळनेर यांना देण्यात यावी, ग्रामपंचायतींनी मागणी केल्याप्रमाणे प्रकल्पांमधून पाणी सोडावे, रोखीने पाणीपट्टी भरण्याची अट शिथील करावी, पाणी टंचाई निवारणार्थ विहिर अधिग्रहण, बोअर यांना मंजुरी मिळावी, आदिवासी विकास विभागामार्फत खावटी कर्जाचे त्वरीत वाटप करावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़ या मागण्या संबंधित विभागांना कळविल्या जातील असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले़