शिंदखेड्यात रॅलीद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:00 PM2019-03-02T23:00:45+5:302019-03-02T23:01:33+5:30
मतदार नोंदणीसाठी केले आवाहन : शिक्षण संस्था, प्रशासनाचा पुढाकार
शिंदखेडा : मतदार नोंदणीबाबत जनजागृतीसाठी शनिवारी शहरात विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर या रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीस शहरवासीयांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र आणि राज्यशास्त्र अभ्यास मंडळामार्फत सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेसाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी.व्ही. पाटील, रॅलीचे मुख्य आयोजक डॉ.संभाजी पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.ए. पाटील, उपप्राचार्य एस.एस. देवकर, पर्यवेक्षक एस.टी. राऊळ, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एस.के. जाधव, प्रा.आर. के. पवार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.आशा कांबळे, डॉ.व्ही.पी. राजपूत, प्रा.मुकेश पाटील, नरेंद्र भामरे, प्रा.आर.एन. पाटील आदि उपस्थित होते. आयोजक डॉ. पाटील यांनी सांगितले की, या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांनी मतदान करावे, त्यासाठी त्यांच्यात मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले. उपप्राचार्य सी.व्ही. पाटील यांनी, लोकशाहीत मतदानाचे असलेले महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले.
तहसीलदार सोनवणे यांनी सांगितले की, युवक हे देशाचे आधारस्तंभ आहे. त्यांनी समाजात जाऊन मतदार नोंदणी उपक्रमाबाबत जनजागृती करावी. १ जानेवारी रोजी १८ वर्ष वय पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी आपली नावे मतदारयादीत नोंदवावीत तसेच जास्तीत जास्त मतदान करणे, हे यशस्वी लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.
ही रॅली शहरातील स्टेशन रोड, वरुळ चौफुली, भगवा चौक, बस स्टॅन्ड परिसर, वरपाडे चौफुली, स्टेट बँक परिसरातून काढण्यात आली. या रॅलीचा समारोप तहसील कार्यालय मैदानात झाला.
त्याप्रसंगी_ वि अधिकारी, पी. एन दावळे, तलाठी एस.डी. बाविस्कर, तलाठी तुषार पवार, शिवाजी वाघ, पाटणचे प्रा. व्ही. एस. पवार, प्रा. जी.बी. बोरसे, डॉ. डी. जे. सोनवणे, प्रा.आर. आर. पाटील, प्रा. स्वप्नील गांगुर्डे आदि उपस्थित होते. रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन शहर परिसर दणाणून सोडला.
ही रॅली कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील, कुलगुरु डॉ.ई. वायुनंदन, विभागीय संचालक डॉ.धनजंय माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, प्राचार्य डॉ.बी.आर. चौधरी यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली.
या रॅलीत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यासाठी भूषण बागुल, उगरावण्या पटले, वकील पाडवी, अमोल पवार, प्राध्यापक व कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.शहरातील नागरिकांचेही सहकार्य लाभले.