जनआरोग्य योजना- खाजगी रुग्णालयांची नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 05:37 PM2020-08-26T17:37:35+5:302020-08-26T17:38:28+5:30

आतापर्यंत फक्त १३ बाधित रुग्णांवर उपचार

Public Health Scheme - Rejection of Private Hospitals | जनआरोग्य योजना- खाजगी रुग्णालयांची नकारघंटा

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयांची नकारघंटा सुरु आहे. जनआरोग्य योजनेत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करावे यासाठी जिल्हा प्रशासनाने खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींसोबत वेळोवेळी बैठक घेतली. मात्र मोजकी खाजगी रुग्णालये वगळता इतरांनी वेगवेगळी कारणे पुढे करीत कोरोना उपचारांसाठी नकार देत आहेत. आतापर्यंत खाजगी रुग्णालयात या योजनेअंतर्गत फक्त १३ रुग्णांनी उपचार घेतले आहेत.
मोजक्या खाजगी रुग्णालयांचा अपवाद
आतापर्यंत जिल्ह्यातील १३ बाधित रुग्णांनी खाजगी रुग्णालयात योजनेअंतर्गत उपचार घेतले आहेत. शहरातील सिद्धेश्वर रुग्णालयात आतापर्यंत नऊ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. सेवा हॉस्पिटल येथे ३ तर ओम होपीटलमद्ये एका कोरोना बाधित रुग्णाने उपचार घेतला आहे. दरम्यान, जवाहर महाविद्यालयात कोरोना बाधित रुग्णांसाठी १०० खाटांचे नियोजन केले आहे. त्याठिकाणी जनआरोग्य अंतर्गत कोरोनाचे उपचार होणार असून पुढील दोन दिवसात बाधित रुग्णांना तेथे दाखल करण्यात येईल अशी माहिती जनआरोग्य योजनेचे समन्वयक डॉ.सागर माळी यांनी दिली.
जिल्ह्यात जनआरोग्य योजनेत १८ रुग्णालये
जिल्ह्यात जनआरोग्य योजनेत १८ रुग्णालये येतात त्यात शासकीय व खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. धुळे शहरात जनआरोग्य योजना लागू असलेले १३ रुग्णालये आहेत.

Web Title: Public Health Scheme - Rejection of Private Hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.