प्रार्थनास्थळ विटंबनेच्या निषेधार्थ धुळ्यात जनआक्रोश मोर्चा
By अतुल जोशी | Published: June 10, 2023 12:33 PM2023-06-10T12:33:19+5:302023-06-10T12:33:57+5:30
हजारो नागरिकांचा सहभाग, मोर्चा शांततेत, पोलिसांनी सोडला सुटकेचा श्वास
धुळे: शहरातील छत्रपती संभाजीनगरात झालेल्या प्रार्थनास्थळाच्या विटंबनेच्या निषेधार्थ धुळ्यात आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. तब्बल दीड तास चालेलेल्या या मोर्चाची शिवतीर्थावर सांगता झाली. कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने, पोलिसांनीही सुटकेचा श्वास सोडला. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने, शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान या प्रार्थनास्थळाच्या विटंबनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आललेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
धुळे शहरातील छत्रपती संभाजीनगरातील प्रार्थनास्थळाची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ तीन जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर एकाला अटक करण्यात आली.
शनिवारी सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरूवात झाली. पाचकंदिल, जुना आग्रारोड, जुनी महापालिका, सिव्हीलमार्गे हा मोर्चा शिवतिर्थावर धडकला. या मोर्चाला खासदार डॅा. सुभाष भामरे, अनुप अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमिवर शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोर्चा शांततेत पार पडला. कुठेही अनूचित प्रकार न घडल्याने पोलिसांनीही सुटकेचा श्वास सोडला. मोर्चात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, प्रा. शरद पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे यांच्यासह हजारो नागरिकांसह भाजपचे पदाधिकारी शिवसेनेचे ठाकरे व शिंदे गटाचे पदाधिकारीही मोर्चात सहभागी झालेे झाले होते. प्रार्थना स्थळाच्या विटंबनेप्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंदला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.