मी सक्षम आहे का, हे जनता ठरवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:50 AM2019-07-20T11:50:31+5:302019-07-20T11:50:51+5:30

घराणेशाहीतुन पुढे आल्याने आपण नेतृत्वासाठी सक्षम आहात का ? : तरूणाने विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे उत्तर

The public will decide whether I am capable | मी सक्षम आहे का, हे जनता ठरवणार

जयहिंद वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली़

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  घराणेशाहीतुन आपन पुढे आले आहात,  आपन नेतृत्वासाठी सक्षम ठरू शकाल का? असा प्रश्न जयहिंद महाविद्यालयातील एका तरूणांनी आदित्य ठाकरेंना केला. तेव्हा मी राजकारणात नेतृत्वासाठी सक्षम आहे का, हे जनतेने  ठरवावे, लोकशाहीने तुम्हाला तो अधिकार दिला असल्याचे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले.
वाडीभोकर रोडवरील जयहिंद वरिष्ठ महाविद्यालयात   जनआशीर्वाद यात्रे अंतर्गत आदित्य संवाद कार्यक्रम घेण्यात आला़ तत्पूर्वी मालेगाव रोडवरील  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासुन त्यांचा रोड शो झाला़ दुपारी १२ वाजता आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद रथाचे आगमन महाविद्यालयात झाले़  आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याने सकाळपासुनच तरूणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते़ 
शहरातील मालेगावरोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रोडशोला प्रारंभ झाला. त्यानंतर राजकमल चौक, पाचकंदील चौक, शहर पोलीस चौकी, सराफ बाजार, बॉम्बे लॉज, कराचीवाला खुंट याठिकाणी रोडशोचे स्वागत करण्यात आले. तर खंडेराव मंदिराजवळ आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले़ त्यानंतर आग्रारोडवरील श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन महाआरती केली. यावेळी प्रथम महापौर भगवान करनकाळ यांनी ठाकरे यांना तलवार भेट देऊन स्वागत केले़ तर पुढे फुलवाला चौक, महात्मा गांधी पुतळा, पंचवटी नेहरुनगर मार्गे ही रॅली जयहिंद महाविद्यालयात दुपारी १२ वाजता पोहचली.
शिक्षणमंत्री होण्याची इच्छा 
तुम्ही शिक्षणमंत्री झालात तर शिक्षण पध्दतीत कोणते बदल कराल? असा प्रश्न एका विद्यार्थ्यांनी विचारल्यावर आदित्य ठाकरे यांनी सांगितले  की, शिवसेनेच्या माध्यमातून भविष्यात जर शिक्षणमंत्री होण्याची संधी मिळाली तर राजकारणात युवकांना स्थान देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राध्यान दिले जाईल, असे आश्वासन तरुणांना दिले.
*दिग्गज नेत्यांची हजेरी *
बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,  पालकमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, अतुल सोनवणे, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, प्रा.शरद पाटील, अ‍ॅड.पंकज गोरे, डॉ़ सुशिल महाजन, प्रथम महापौर भगवान करनकाळ, हेमंत साळुंखे, संजय जाधव,  नरेंद्र परदेशी, धिरज पाटील, शानाभाऊ सोनवणे, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते़
*चोरट्यांची हातसफाई *
आदित्य ठाकरे यांचा जिल्हा दौरा असल्याने चोख पोलिस बंदोबस्त तैनाद केला होता़ मनोहर टॉकीज ते जयहिंद महाविद्यालयापर्यत शुक्रवारी सकाळी रोड शो काढण्यात आला होता़ याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी पत्रकार, तरुण तसेच पुढाºयांना मोबाईल चोरून नेला़
कर्जमाफीसाठी प्रयत्न
शेतकºयांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्त करायचे आहे. यासाठी शिवसेना सतत सहकारशी संघर्ष करीत आहे. आम्ही मुंबईत राहून शेतकºयांशी भांडतो. प्रसंग पडला तर शेतकºयांसाठी रस्त्यावर देखील उतरु. मात्र शेतकºयांना कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित विजय संकल्प मेळाव्यात दिले. 
याप्रसंगी मंचावर उत्तर महाराष्ट्र प्रमुख खासदार संजय राऊत, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, महिला संघटक प्रियंका घाणेकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर यात्रा काढण्यात येत आहे. आज धुळ्यात आपल्यासमोर आशीर्वाद घेण्यासाठी उभा आहे. येणाºया काळात जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन यावेळी केले. धुळे जिल्हा रुग्णालयाची स्थिती अत्यंत वाईट असल्याची माहिती मला मिळाली आहे. येणाºया १५ दिवसाच्या कालावधीत प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
प्रश्न: उत्तर महाराष्ट्रात काही सोनं पिकत नाही, इथलाही शेतकरी
आत्महत्या करतो त्याकडे शिवसेना लक्ष देईल का?
आदित्य :  उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाने
होरपळतो आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांकडे लक्ष दिले जाईल.
 भविष्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाय केले जातील.
प्रश्न: परीक्षांचे निकाल उशीरा लागतात, बहुतेकदा ते चुकीचे असतात, पेपर फेरतपासणीला टाकला तरी त्याचा निकाल लवकर लागत नाही, यावर शिवसेना काय करेल?
आदित्य : युवा सेनेच्या माध्यमातून विद्यापीठांना वेळेवर निकाल
लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. वेळोवेळी याचा जाब विचारला जाईल. शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहू.
प्रश्न : उत्तर महाराष्ट्रातील युवकांना शिवसेना काय देणार?
आदित्य : तीन राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या धुळे शहरासाठी अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यास शिवसेना कटीबध्द आहे. उज्वल भवितव्यासाठी शिवसेना एज्युकेशन हबचे निर्माण करतांनाच अद्ययावत महाविद्यालये उभारण्यासाठी प्रयत्न करेल.
प्रश्न : शेतकºयांच्या मुलांना मोफत पास कधी मिळणार? रावते  
साहेबांना सांगून ते काम आधी करा.
आदित्य : नक्कीच! दुष्काळाची परिस्थिती पहाता शेतकºयांच्या
पाल्यांना मोफत पास देण्यासाठी येणाºया काळात प्रयत्न केले जाईल़
प्रश्न : शेतकºयांची कर्जमाफी कधी होणार?
आदित्य : शेतकरी कर्जमाफी नव्हे तर शेतकरी कर्जमुक्ती हे शिवसेनेचे
धोरण असून शिवसेना कायमच शेतकºयांच्या बाजूने ठामपणे उभी राहीली आहे. यापुढेही शेतकरी हिताचेच निर्णय शिवसेना घेईल, अशी मी ग्वाही देतो.

Web Title: The public will decide whether I am capable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे