धुळे जिल्हयात १३ हजार क्विंटल भरडधान्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:21 AM2019-01-31T11:21:22+5:302019-01-31T11:23:10+5:30

७३५ शेतकºयांनी केली होती आॅनलाइन नोंदणी

The purchase of 13 thousand quintals of mustard in Dhule district | धुळे जिल्हयात १३ हजार क्विंटल भरडधान्याची खरेदी

धुळे जिल्हयात १३ हजार क्विंटल भरडधान्याची खरेदी

Next
ठळक मुद्दे१ नोव्हेंबरपासून सुरू झाली होती खरेदी७३५ शेतकºयांनी केली होती नोंदणीसाक्री केंद्रावर धान्याची आवक नाही

आॅनलाइन लोकमत
धुळे  : नाफेडच्यावतीने यावर्षी  ज्वारी, बाजरी, मका या भरडधान्याचे आॅनलाईन खरेदीसाठी धुळे जिल्ह्यात केंद्र सुरू करण्यात आले होते. साक्री वगळता उर्वरित तीन केंद्रावर ५११ शेतकºयांकडून  १३ हजार १९३ क्विंटल ज्वारी व मक्याची खरेदी करण्यात आलेली आहे. तर एकाही केंद्रावर बाजरीची खरेदी झालेली नाही.  
 केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार १ नोव्हेंबर १८  ते १५ जानेवारी १९  या कालावधीत ज्वारी, मक्याची या भरडधान्याची हमीभावाने खरेदी झाली. 
मक्याला  १७०० रूपये तर ज्वारीला २४३० रूपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आलेला होता. 
जिल्ह्यात चार केंद्र
नाफेडतर्फे धुळे जिल्ह्यात धुळ्यासह शिरपूर, शिंदखेडा व साक्री येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली होती. 
७३५ शेतकºयांनी केली नोंदणी
भरडधान्य आॅनलाइन खरेदीसाठी तीन केंद्रावर ७३५ शेतकºयांनी नोंदणी केलेली होती. त्यात मका खरेदीसाठी ५८२ तर ज्वारी खरेदीसाठी १५३ शेतकºयांचा समावेश होता. त्यापैकी ५११ शेतकºयांकडून प्रत्यक्ष भरडधान्याची खरेदी करण्यात आली. त्यात मका ३६५ तर १४६ शेतकºयांकडून ज्वारीची खरेदी करण्यात आलेली आहे. 
१३ हजार १९३ 
क्विंटल धान्य खरेदी
जिल्ह्यातील केंद्रावर एकूण १३ हजार १९३ भरडधान्याची खरेदी करण्यात आलेली आहे. यात मक्याची ९ हजार ५९४.५० क्विंटल तर ज्वारीची ३ हजार ५९८.५० क्विंटल खरेदी करण्यात आली. 



 

Web Title: The purchase of 13 thousand quintals of mustard in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे