दुसऱ्या दिवशी ३ हजार ८०० क्विंटल कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:57 PM2020-05-05T21:57:53+5:302020-05-05T21:58:09+5:30
दोंडाईचा बाजार समिती : दररोज चार हजार क्विंटल कापसाच्या खरेदीचे नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत सी.सी.आय.ने सुरू केलेल्या कापूस खरेदीचा दुसºया दिवशी सुमारे तीन हजार ८०० क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. मंगळवारी दुसºया दिवशी १०५ ते ११० वाहनांच्या कापसाचा लिलाव झाला.
दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीने तालुक्यातील तीन जिनिंगमध्ये दररोज चार हजार क्विंटल कापसाच्या खरेदीचे नियोजन केले आहे. सद्यस्थितीत धुळे रस्त्यावरील अभिषेक जिनिंग, बाम्हणे रस्त्यावरील केशरानंद जिनिंग, शिंदखेडा येथील वर्धमान जिनिंगला कापसाची खरेदी सुरू आहे.
शिंदखेडा तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळील कापूस विक्रीसाठी पणन महासंघाकडे नोंद केली आहे.
या पूर्वी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्यस्थीने सी.सी.आय.ने कापूस खरेदी सुरू केली होती.
दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीत, लॉकडाउनमध्ये कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.
कापूस खरेदी होत नसल्याने शेतकºयांनी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्याकडे मागणी केली होती. आमदार जयकुमार रावल यांनी सी.सी.आय.च्या अधिकाºयांशी चर्चा केली.
त्यानुसार दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी तालुक्यातील शेतकºयांना कापूस विक्री नोंद करण्याचे आवाहन केले. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक जास्त म्हणजे सहा हजार शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी पणन महासंघाकडे नोंद केली आहे.
मंगळवारी दुसºया दिवशी तीनही जिनिंगमध्ये १०५ ते ११० वाहनातील ३७०० ते ३८०० क्विंटल कापसाची खरेदी होणार असल्याची माहिती बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, सचिव पंडित पाटील यांनी दिली.
कमी भाव मिळत असल्याची होती तक्रार...
लॉकडाउनमुळे सी.सी.आय.ने कापूस खरेदी बंद केली होती. त्यामुळे खुल्या बाजारात कापसाचे दर कमी होते. व्यापारी फार कमी भाव देत असल्याची तक्रार होती. घरात पडलेल्या कापसामुळे खाज सुटत होती. खरीप हंगामाला पैसा पाहिजे, या पार्श्वभूमीवर कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकºयांत समाधान दिसत आहे.