लोकसहभागातून होणा:या घटबारी धरणाचा खरीपाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 11:28 AM2017-06-14T11:28:55+5:302017-06-14T11:28:55+5:30
शासनाने आर्थिक मदत न केल्याने येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम सुरू केले होते.
ऑनलाईन लोकमत
जैताणे, धुळे, दि. 14 - ऑक्टोबर 2016मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे माळमाथा परिसरातील प्रमुख जलस्त्रोत समजल्या जाणारे घटबारी धरण फुटले होते. परिणामी, शेतक:यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने येथील परिसरात पंचनामेही केले. लोकप्रतिनिधींनीही आश्वासनांचा पाऊस येथील शेतक:यांसमोर पाडला होता. तरीही शासनाने आर्थिक मदत न केल्याने येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम सुरू केले होते. हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांना खरीप हंगामात फायदा होणार आहे.
डोमकानी, खुडाणे, जैताणे, निजामपूरचे शेतकरी हवालदिल
अतिवृष्टीमुळे घटबारी धरणाला मोठे भगदाड पडले. परिणामी, येथील शेकडो एकर शेतजमीन ही जलमय झाली होती. उभी पिके शेतक:यांच्या डोळ्यादेखत वाहून गेली होती. या अतिवृष्टीमुळे डोमकानी, खुडाणे, जैताणे व निजामपूर येथील शेतकरी हवालदिल झाले होते. शासनाकडून मदतीच्या अपेक्षेत असलेल्या शेतक:यांना मदतही लवकर मिळू शकली नाही.
1200 एकर जमीन ओलिताखाली येणार
धरण बांधण्यासाठी शेतक:यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनातर्फे धरणाच्या बांधकामासाठी लागणा:या खर्चासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगून हात वर केले. त्यामुळे घटबारी जलसंधारण समितीच्या सदस्यांनी मे महिन्यात खुडाणे येथे धरण नव्याने तयार करण्यासाठी बैठक बोलावली. बैठकीतून धरणाचे काम लोकसहभागातून करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर खुडाणे व परिसरातील 350 ग्रामस्थांनी धरण परिसरात अवजारे घेऊन कामास सुरुवात केली. 21 मे रोजी सुरू झालेले हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. या धरणाचे प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील सुमारे 1200 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्यामुळे नाराजी
घटबारी धरण फुटल्यानंतर लोकप्रतिनिधींनी घटबारी धरण परिसरात येऊन भेटी दिल्या. शेतकरी व ग्रामस्थांचे सांत्वन केले. परंतु, प्रत्यक्षात निधी मिळविण्यासाठी लोकप्रनिधींनी दुर्लक्ष केले असून लोकप्रतिनिधी हे केवळ कामाचे भांडवल करत असल्याचा आरोप पराग गवळे, धनराज गवळे, नामदेव गवळे, महेंद्र हेमाडे, मधुकर वाघ, विनोद गवळे, देवाजी वंजारी, मिलिंद भार्गव, वासुदेव बदामे, पांडुरंग महाले, पोपट बाविस्कर, राम सोनवणे, कृष्णा भिल आदींनी केला आहे.
300 ट्रॅक्टर काळी माती तर 100 ट्रॅक्टर मुरूम टाकले
धरण परिसरात आतार्पयत ग्रामस्थांच्या सहकार्याने 300 ट्रॅक्टर काळी माती व 100 ट्रॅक्टर मुरूम टाकण्यात आला आहे. यासाठी गावातील वयोवृद्ध व्यक्ती व महिलांनीही मेहनत घेतली आहे. हे काम ज्या दिवसांपासून सुरू झाले, ते आजतागायतही सुरू असून त्यात खंड पडलेला नाही, हे विशेष.
2 लाख 70 हजारांची लोकवर्गणी
घटबारी धरणाच्या कामासाठी गावक:यांनी केवळ श्रमदान केले नाही, तर लोकवर्गणीतून 2 लाख 70 हजार रुपयांची लोकवर्गणीही जमा केली आहे. परंतु, धरणाचे काम खूप मोठे असल्यामुळे अजूनही आर्थिक व तांत्रिक मदतीची आवश्यकता आहे.