साडेतीन लाख क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:02 PM2020-08-12T23:02:10+5:302020-08-12T23:02:19+5:30
दोंडाईचा सीसीआय केंद्र : कापसाचे १७५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावावर जमा
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सीसीआयने यावर्षी तीन केंद्रावर ३ लाख २८ हजार २२८ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. सीसीआयने कापसाच्या रक्कमेपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १७५ कोटी रुपये जमा केल्याची माहिती सीसीआयचे आदित्य वामन यांनी दिली आहे.
खाजगी व्यापाºयांमार्फत शेतकºयांना कापसाला जादा भाव मिळत नव्हता. शेतकºयांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून आमदार जयकुमार रावल यांनी भारतीय कपास निगमकडे तात्काळ कापूस खरेदीची मागणी केली होती. सीसीआयने २० नोव्हेंबर २०१९ ते २१ मार्च दरम्यान कापूस खरेदी केली. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने २२ मार्चपासून दोंडाईचा येथे कापूस खरेदी बंद झाली. शेतकºयांच्या मजबुरीचा गैरफायदा परिसरातील काही खाजगी व्यापाºयांनी घेतला व शेतकºयांकडून कमी दराने कापूस खरेदी केला.
शेतकºयांचा घरात हजारो क्विंटल कापूस मोजणीविना पडला होता. याची दखल पुन्हा आमदार जयकुमार रावल यांनी घेऊन भारतीय कपास निगमला कापूस खरेदी करण्याची मागणी केली. त्यानुसार पुन्हा दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ४ मे २०२० पासून सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली होती. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी याकामी मेहनत घेऊन कापूस मोजणेकामी विशेष लक्ष दिले. दोंडाईचा येथील अभिषेक जिनिंग, बाम्हणे येथील केशरानंद जिनिंग, शिंदखेडा येथील वर्धमान जिनिंग या तिन्ही ठिकाणी कापूस खरेदी झाली आहे. सीसीआयने कापूस खरेदी करावा, यासाठी सुमारे ६ हजार ४०० शेतकºयांनी नोंदणी केली होती.
१० जूनपावेतो २ लाख ६० हजार क्विंटल कापूस व ५४ हजार कापसाच्या गाठी तयार होत्या. तर १८ जूनपावेतो २ लाख ७२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली व ५६ हजार गाठी तयार होत्या. ८ जुलैपर्यंत २ लाख ९२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. तर सुमारे १५८ कोटी रुपये कापसाचे वाटप झाले होते. तर कापसाच्या गाठी सुमारे ६१ हजार होत्या. सरकीची लवकरच विक्री होणार आहे. दरम्यान, काही खरेदी केंद्रांवर छत नसल्याने कापूस व गाठी, सरकी ओली झाल्याची तक्रार आहे.
आमदार जयकुमार रावल हे सीसीआयने तालुक्यातील संपूर्ण कापसाची खरेदी करावी, यासाठी प्रयत्नशील होते. ते स्वत: याकामी लक्ष ठेऊन होते. याकामी सीसीआयचे आदित्य वामन, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, सचिव पंडित पाटील आदींनी प्रयत्न केले.
यावर्षी सीसीआय मार्फत ३ लाख २८ हजार २७८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून १७५ कोटी रुपये शेतकºयांच्या नावावर अदा करण्यात आले आहे. तर कापसाच्या गाठी ६८ हजार २८२ असल्याची माहिती सीसीआयचे आदित्य वामन यांनी दिली.