धुळे विभागात आठ दिवसात साडेतीन हजार क्विंटल हरभरा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 04:20 PM2018-04-15T16:20:16+5:302018-04-15T16:20:16+5:30

आॅनलाइन खरेदीला शेतकºयांकडून मिळतोय प्रतिसाद

Purchase three and a half quintals of gram in Dhule division in eight days | धुळे विभागात आठ दिवसात साडेतीन हजार क्विंटल हरभरा खरेदी

धुळे विभागात आठ दिवसात साडेतीन हजार क्विंटल हरभरा खरेदी

Next
ठळक मुद्देपहिल्यांदाच होतेय आॅनलाइन हरभरा खरेदीविभागात सहा केंद्र सुरूशेतकºयांकडून मिळतोय प्रतिसाद

आॅनलाइन लोकमत
धुळे : नाफेडच्यावतीने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सहा केंद्रावर आॅनलाइन पद्धतीने हरभºयाची खरेदी सुरू झालेली आहे.  गेल्या आठ दिवसात ३ हजार ५८१. ०४ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे.
राज्य शासन व नार्फेडतर्फे मूग, उडीद, सोयाबीन, तूर  पाठोपाठ आता हरभºयाची आॅनलाइन  खरेदी सुरू केली. आहे. यात धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, दोंडाईचा येथे तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ६ एप्रिलपासून ही खरेदी सुरू झालेली आहे.
हरभºयाची प्रथमच खरेदी
गेल्यावर्षी नाफेडतर्फे आॅनलाइन खरेदी करण्यात आलेला नव्हता. या वर्षी प्रथमच आॅनलाइन  नोंदणी पद्धतीने खरेदी केला जात आहे.
आतापर्यंत ३५८१ क्विंटल आवक
गेल्या आठ दिवसात धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील केंद्रावर आतापर्यंत ३ हजार ५८१ क्विंटल हरभºयाची आवक झालेली आहे. यात धुळे येथे ८७६.३५, शिरपूर- १२८६.६५, दोंडाईचा-६४६.४०, साक्री-२२३.८३, नंदुरबार १२२.८० तर शहादा येथे ४२५ क्विंटल हरभºयाची खरेदी झालेली आहे.
हरभºयाची हमीभाव खरेदीसाठी आॅनलाइन  नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटींग फेडरेशनतर्फे करण्यात आलेले आहे.
 दरम्यान हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करतांना शेतकºयांनी ७-१२ उतारा, बॅँकेचे पासबुक, आधारकार्ड झेरॉक्स, पीकपेरा आदी कागदपत्रे जोडणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
१८ हजार क्विंटल तूर खरेदी
धुळे- नंदुरबार जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रावर १ फेब्रुवारी २०१८ पासून आॅनलाइन नोंदणीने तुरीची खरेदी सुरू झाली. १३ एप्रिल अखेरपर्यंत १७ हजार ९९९.३२  क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. यावर्षी आॅनलाइन तुर खरेदीलाही चांगल्या पैकी प्रतिसाद मिळाला आहे.


 

 

Web Title: Purchase three and a half quintals of gram in Dhule division in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे