करवसुलीची उद्दिष्टपूर्ती बंधनकारक!

By Admin | Published: March 3, 2017 12:02 AM2017-03-03T00:02:00+5:302017-03-03T00:02:00+5:30

धुळे : शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाई करून मार्च महिन्यात १०० टक्के करवसुली करण्याचे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत़

Purpose of tax collection is mandatory! | करवसुलीची उद्दिष्टपूर्ती बंधनकारक!

करवसुलीची उद्दिष्टपूर्ती बंधनकारक!

googlenewsNext

धुळे : शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाई करून मार्च महिन्यात १०० टक्के करवसुली करण्याचे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत़ त्यामुळे करवसुलीसाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करणार असून थकबाकीदारांच्या याद्या प्रसिद्ध करणार असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली़
वाढत्या नागरिकरणामुळे येणाºया जबाबदाºया व कर्तव्य स्वत:च्या आर्थिक क्षमतेवर महापालिकांनी पार पाडणे शासनाला अपेक्षित आहे़ मालमत्ता करापासून प्राप्त होणारे उत्पन्न हे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुलाचे मुख्य स्त्रोत असून प्रभावी करवसुली झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक सक्षमता वाढणार आहे़ काही मालमत्ताधारकच कर भरणे टाळत असतात़ परिणामी, २० टक्के मालमत्ताधारकांकडे ८० टक्के कर थकीत असतो़ त्यामुळे अशा थकबाकीदारांवर करवसुलीसाठी ठोस कार्यवाही आवश्यक आहे, असे नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशात नमूद आहे़ त्याचप्रमाणे आयुक्तांना २०१६-१७ मध्ये महसूल वाढीसाठी ९० टक्क्यांपेक्षा अधिक कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ सदर उद्दिष्टांची पूर्तता करणे आयुक्तांना बंधनकारक आहे़  त्यामुळे महापालिकांनी ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टीची १०० टक्के वसुली करावी, त्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत़
दरम्यान, शासनाच्या आदेशानंतर प्रशासनाने थकबाकी वसुलीचे नियोजन सुरू केले असून थकबाकीदार मालमत्ताधारक व पाणीपट्टीधारकांच्या याद्या तयार केल्या आहेत़ सदरच्या याद्या वृत्तपत्रातून तसेच डिजिटल बॅनर्सद्वारे प्रसिद्ध केल्या जाणार असून त्यानंतर थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार आहे़ त्याचप्रमाणे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा करवसुलीच्या कामास लावली जाणार असून वेगवेगळी पथके तयार करून या पथकांकडून कारवाईदेखील केली जाणार आहे़ महापालिकेने यंदा नोटाबंदीनंतर जवळपास १५ कोटी रुपयांची वसुली केली असून त्यात मालमत्ता कर व पाणीपट्टीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे़ मात्र अजूनही मालमत्ताधारकांकडे १२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने या थकबाकीच्या वसुलीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त संगीता धायगुडे यांनी स्पष्ट केले़
केवळ मालमत्ताधारकच नव्हे तर मनपा क्षेत्रातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे असलेली थकबाकीदेखील तातडीने वसूल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ जिल्हाधिकाºयांनी संबंधित कार्यालयांना थकबाकी भरण्याच्या सूचना द्याव्यात, असे शासनाने स्पष्ट केले आहे़ जे थकबाकीदार मालमत्ता कर भरणार नाही, त्यांच्यावर अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करून ३१ मार्चपर्यंत वसुली मनपाला करावी लागणार आहे़ त्याचप्रमाणे विशेष वसुली मोहिमेचा अहवालदेखील शासनाला २० एप्रिलपर्यंत सादर करावा लागणार असल्याने मनपाकडून विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे़ महापालिकेकडून सध्या शास्ती माफीची मोहीमदेखील राबविली जात आहे़ अर्थात, या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद नसला तरी वसुलीच्या रकमेत मागील वर्षाच्या तुलनेत निश्चितपणे मोठी वाढ होणार आहे़

Web Title: Purpose of tax collection is mandatory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.