धुळ्यात पती-पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 12:20 IST2019-04-01T12:20:13+5:302019-04-01T12:20:40+5:30
पोलिसांची सर्तकता : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील घटना

धुळ्यात पती-पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सिंचन विहिर मंजूर आहे़ शासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करुन खोदकाम सुरु केले़ रस्त्यापासून सुमारे २० फुट अंतरावर असून विहिरीचे खोदकाम २० फुटापर्यंत झालेले आहे़ अशा परिस्थितीत मालपूर गावातील रहिवाशी व सध्या शिंदखेडा येथील भूमिअभिलेख कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेला न्हानू देवराम धनगर (भामरे) हा माझ्या विहिरीच्या खोदकामास अडथळा आणत आहे़ माझ्या विरुध्द अर्ज करुन त्रास देत आहे़ विहिर दुसºया जागेवर खोदावी अशी त्याचा आग्रह आहे़ या संशयित व्यक्तीचा कायदेशिर बंदोबस्त करुन माझ्या विहिरीचे अनुदान मिळावे अशी मागणी करत शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील प्रकाश पोपट धनगर यांनी पत्नीसह जिल्हाधिकारी कार्यालय आवारात रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ ही घटना सोमवारी सकाळी घडली़ पोलिसांच्या सर्तकतेमुळे हा प्रयत्न फसला़ यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांची समस्या नेमकी काय हे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी समजून घेतली़