प्रश्नमंजुषा स्पर्धेत ए.आर. पटेल प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:03 PM2019-07-03T22:03:42+5:302019-07-03T22:04:00+5:30

विजेते विद्यार्थ्यांसमवेत डॉ़शारदा शितोळे, दिनेश राणा, निश्चल नायर, डॉ़विनय पवार, हर्षदा पाटील़

Q.Company competition AR Patel First | प्रश्नमंजुषा स्पर्धेत ए.आर. पटेल प्रथम

प्रश्नमंजुषा स्पर्धेत ए.आर. पटेल प्रथम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील पी.ई.एफ.आय. संघटना,  एच.आर. पटेल कला महिला महाविद्यालय व आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यायाच्या संयुक्त विद्यमाने नुकताच प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन ए.आर.पटेल सी.बी.एस.सी.स्कूल मध्ये करण्यात आले होते.
या स्पर्धेत ए.आर.पटेल सी.बी.एस.ई. स्कूल, एम.आर.पटेल मिलिटरी स्कूल व आर.सी.पटेल इंग्लिश स्कूल सहभागी झाले होते. या स्पर्धेत आॅलिंपिक व स्पोर्ट्स संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ए.आर.पटेल सी.बी.एस.ई.स्कूलचा तर द्वितीय क्रमांक एम.आर.पटेल मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला. प्राचार्य डॉ.शारदा शितोळे, प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील, प्राचार्य दिनेश राणा, प्राचार्य निश्चल नायर उपस्थित होते. स्पर्धेचे समन्वयक डॉ.विनय पवार व प्रा.हर्षदा पाटील यांनी काम पाहिले. जयवंत ठाकूर, आराधना दुबे, ज्योत्सना जाधव, अनुप चंदेल व मोसिन कुरेशी यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Q.Company competition AR Patel First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे