दहा ग्रामपंचायत अंतर्गत कर्मचाऱ्यांची क्यूआर कोड प्रणाली हजेरीला लवकरच सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 12:55 PM2022-10-19T12:55:54+5:302022-10-19T12:56:06+5:30

धुळे तालुक्यातील आर्वी,बोरीस, कापडणे, आनंदखेडे, नेर, कुसुंबा, लामकानी, मुकटी, नगाव, शिरुड या ग्रुप ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांतर्गत कार्यरत जिल्हा परिषद अंतर्गत ...

QR code system attendance of employees under 10 Gram Panchayats to start soon | दहा ग्रामपंचायत अंतर्गत कर्मचाऱ्यांची क्यूआर कोड प्रणाली हजेरीला लवकरच सुरुवात

दहा ग्रामपंचायत अंतर्गत कर्मचाऱ्यांची क्यूआर कोड प्रणाली हजेरीला लवकरच सुरुवात

Next

धुळे तालुक्यातील आर्वी,बोरीस, कापडणे, आनंदखेडे, नेर, कुसुंबा, लामकानी, मुकटी, नगाव, शिरुड या ग्रुप ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांतर्गत कार्यरत जिल्हा परिषद अंतर्गत सर्व संवर्ग व विभागातील क्षेत्रीय कर्मचारी जिल्हा परिषदेचे ग्रामविकास अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, प्राथमिक शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यात ॲड्राॅईड मोबाईलमध्ये दररोज हजेरी कशी लावावी या विषयावर प्रशिक्षणात माहिती देण्यात आली.

प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील प्रत्येक दहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पूर्ण जिल्हाभर "क्यूआर कोड आधारित हजेरी प्रणाली कार्यान्वित होईल. तसे नियोजन तालुकानिहाय सुरू आहे. सुरुवातीला या प्रणालीत काय समस्या येते. संबंधित समस्याचे निराकरण कंपनीच्या साॅप्टवेअर मार्फत सोडवले जाणार आहे. थोडक्यात या प्रणालीची हजेरी ऑनलाईन राहिल. कर्मचारी नेमका कुठे व कोणत्या ठिकाणी आहे. याची सविस्तर माहिती वरिष्ठ कार्यालय व अधिकाऱ्यांना तत्काळ समजेल.

या प्रणालीत चेहरा अपलोड केला आहे. तोच कर्मचारी आहे. हे लक्षात येईल. उडवाउडवीची उत्तरे कर्मचारी देऊ शकत नाही. सर्व स्तरावर एकच उत्तर मिळेल. मध्यंतरी बायोमेट्रिक हजेरी प्रणालीत कर्मचाऱ्यांनी पळवाटा शोधून ठेवल्या होत्या. दोन नावावर एकच थंब होता. तो आता बंद होणार आहे. चेहरा (फेसरिंडीग) ओके झाल्यानंतर उपस्थिती समजेल. हे उपकरण जीपीएस सिस्टीमद्वारे थेट मुख्यालयाला तथा तालुका कार्यालयाला जोडले जाणार आहे.

Web Title: QR code system attendance of employees under 10 Gram Panchayats to start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे