नव्या कैद्यांना तुरुंगात करणार क्वारंटाईन, प्रवासी व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 05:53 PM2020-08-23T17:53:17+5:302020-08-23T17:57:40+5:30
धुळे- कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढला आहे. संसर्गाबरोबरच जनमानसातील भीतीदेखील वाढली आहे. वातावरण बदलल्यामुळे जरी सर्दी किंवा खोकला झाला तरी ...
धुळे- कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढला आहे. संसर्गाबरोबरच जनमानसातील भीतीदेखील वाढली आहे. वातावरण बदलल्यामुळे जरी सर्दी किंवा खोकला झाला तरी कोरोनाची टेस्ट करावी असे नागरिकांना वाटते . यामुळे स्वॅब देण्यासाठी रुग्णांची झुंबड उडत आहे. कुणाची कोरोना टेस्ट करावी, यासाठी आता राज्य शासनाने नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे.
कोविड चाचणी करण्याची गरज असणाºया व्यक्तींची तीन गटात विभागणी करण्यात आली आहे. नवीन नियमावली नुसार, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर तुरुंगात दाखल झालेल्या कैद्यांना सर्वप्रथम एक आठवडा तुरुंगातच क्वारंटाईन केले जाणार आहे व एका आठवड्यानंतर त्यांची अँटीजेन टेस्ट करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवासी व व्यापाऱ्यांना कोरोनाची लक्षणे नसतील तर त्यांची चाचणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्वरित उपचारांची गरज असणाºयांची अँटीजेन टेस्ट
ज्या व्यक्तींना इतर उपचारांसाठी त्वरित चाचणी करणे आवश्यक आहे अशा रुग्णांची अँटीजेन चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे त्वरित उपचारांची गरज असलेल्या रुग्णांच्या उपचारांबाबत अर्ध्या तासात निर्णय घेणे शक्य होणार आहे.
लक्षणे असलेले, बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपकार्तील व परदेशातून आलेल्या
व्यक्तींची अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आली तर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. मयत व्यक्तीची तसेच बाळंतपणासाठी आलेल्या महिलांची अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे.
लक्षणे नसणाºया प्रवासी, व्यापाºयांची चाचणी नाही
कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले व्यापारी, प्रवासी व जिल्ह्यात दाखल होणाºया व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व लक्षणे असलेले विक्रेते, व्यापारी व पत्रकारांची अँटीजेन चाचणी करण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या आहेत. शासनाच्या निदेर्शानुसार कोरोना चाचण्या करणार आहोत.
संजय यादव, जिल्हाधिकारी
आज ६०० अँटीजेन किट प्राप्त होतील़ उर्वरित २ हजार किट येत्या दोन दिवसात प्राप्त होतील. कंटेनमेंट झोन मधील लक्षणे असलेले व्यक्ती, बाधित रुग्णाच्या दूरच्या व नजीकच्या संपकार्तील व्यक्तीची चाचणी करण्यात येईल. त्यादृष्टीने नियोजन करीत आहोत.
अजीज शेख, आयुक्त मनपा धुळे