धुळ्यातील नियोजित कृषी विद्यापीठाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:13 PM2019-02-23T12:13:21+5:302019-02-23T12:14:34+5:30

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर नाराजीचा सूर : भाजपाने भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा

The question of the scheduled Agricultural University in Dhule | धुळ्यातील नियोजित कृषी विद्यापीठाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

धुळ्यातील नियोजित कृषी विद्यापीठाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Next
ठळक मुद्दे१९६० मध्ये धुळ्यात कृषी महाविद्यालय स्थापन झाले.धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी अनुकूल वातावरणमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर नाराजीचा सूर

आॅनलाइन लोकमत
धुळे : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून जळगाव जिल्ह्यात कृषी विद्यापीठाची उभारणी करण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे धुळे जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तसेच धुळ्यातील नियोजित कृषी विद्यापीठाचा प्रश्न पुन्हा अधांतरीत राहणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कृषी विद्यापीठ धुळ्यात होण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकजूट दाखविण्याची गरज निर्माण झालेली आहे.
१९६० मध्ये धुळ्यात कृषी महाविद्यालय स्थापन झाले. त्यावेळी संभाव्य कृषी विद्यापीठ धुळ्यात होणे अपेक्षित होते. १९६३-६४ मध्ये धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी अनुकूल वातावरण असतांना राहूरी येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले.
राज्यातील दोन कृषी विद्यापीठांचे विभाजन करून, नवीन विद्यापीठ निर्माण करण्यााठी शासनाने डॉ. व्यंकटेश्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. यात ज्या ठिकाणी कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी पुरक वातावरण आहे, अशाच ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असा समितीचा अहवाल आहे. त्यात धुळ्याचे नाव प्राधान्यक्रमावर आहे.
जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून, कृषी विद्यापीठ धुळ्यात होण्याची एकमुखी मागणी केली आहे.आघाडी व युती शासनाने स्थापन केलेल्या या दोन्ही अहवालांची अंमलबजावणी करून, धुळे जिल्ह्यात लवकरात लवकर कृषी विद्यापीठ स्थापन करावे अशी सातत्याने मागणी करण्यात आली. धुळे जिल्हयात कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीने वारंवार आंदोलने केली. मात्र तरीही शासनाने निर्णय घेतला नाही.
मात्र भुसावळ येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यात कृषी विद्यापीठ उभारणीसाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. त्यामुळे धुळ्यातील कृषी विद्यापीठाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे नाराजीचा सूर उमटला आहे.

 

Web Title: The question of the scheduled Agricultural University in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे