रब्बीत शेतकरी पाण्यासाठी अनुत्सूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:02 PM2019-12-20T12:02:23+5:302019-12-20T12:02:48+5:30

लाटीपाडा धरण : १५ शेतकऱ्यांनी भरले पाणी अर्ज; हंगाम काहीअंशी लांबला

Rabbit Farmers Avoid Watering | रब्बीत शेतकरी पाण्यासाठी अनुत्सूक

Dhule

Next

पिंपळनेर : रब्बी हंगाम यंदा एक महिना उशिरा होऊनही लाटीपाडा धरणातून शेतकरी पाणी मागत नसल्याचे दिसून येत आहे. पाटबंधारे विभागाने पाणी अर्ज भरणे सुरू केले असून देखील हे अर्ज भरण्यासाठी शेतकरी उत्सुक नसून आतापर्यंत १५ शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरून पाण्याची मागणी केली आहे.
गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी लाटीपाडा धरणातून पाटाद्वारे शेतकºयांना तसेच डाव्या व उजव्या कालव्यावरील शेती करणाºया शेतकºयांना लाटीपाडा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. यंदा एक महिना उशिर होऊनही रब्बी हंगामासाठी अद्याप शेतकºयांनी सुरुवात केलेली नाही. तसेच पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी अद्याप शेतकºयांनी केलेली नाही. रब्बी हंगामाची सुरुवात ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होत असल्याने शेतकरी मशागती करण्यास तसेच पिकांची पेरणी करण्यास सुरवात करीत असतात. तसेच डाव्या व उजव्या कालव्यावर अंदाजे एक हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्र हे लाटीपाडा धरणावर अवलंबून असते.पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी रब्बी हंगामासाठी धरणात असलेल्या शिल्लक पाण्याचे नियोजन रब्बीसाठी करण्यात येत असते. यंदाच्या वर्षी पिंपळनेर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच प्रकल्प हे पाण्याने भरलेले आहेत. तसेच विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. असे असून देखील रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या कालव्या अंतर्गत येणारे शेतकरी हे पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच फळबागायतदार व माखळे या शिवारात शेतकºयांनी पेरणीची कामे सुरू केलेली नाहीत.डिसेंबर अर्धा संपला तरी पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी शेतकºयांनी केली नाही.
गेल्या काही दिवसांपासून बंधारे विभागात पाणी मागणे अर्ज भरणे सुरू केले असून देखील याला शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. लाटीपाडा धरण, जामखेली, विरखेल व शेलबरी एमआयटॅन्क आदी धरणांवर अवलंबून असणाºया शेतकºयांनी पाण्याची मागणी केली नाही. तसेच पाणी मागणी अर्ज भरणे सुरू असून अर्ज कोणी भरण्यासाठी धजावत नसल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रकल्प हे पाण्याने पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.
रब्बी हंगाम काहीअंशी लांबला आहे. तसेच डिसेंबर महिना सुरू होऊनही यंदा थंडीचे प्रमाण हे कमी आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकºयांच्या चिंता या वाढलेल्या आहेत.
दरम्यान पाटबंधारे विभागातर्फे पाणी सोडण्यात येणाºया पाटचाºयांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगले आहे. तसेच गाळ साचलेला आहे. जेसीबीच्या साह्याने हा गाळ काढण्यात यावा, तन देखील काढण्यात यावे अशी मागणी या परिसरातील शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

Web Title: Rabbit Farmers Avoid Watering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे