मांजरोद, नांथे येथे जुगार अड्डयावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:15 PM2020-08-10T22:15:22+5:302020-08-10T22:15:47+5:30
शिरपूर : थाळनेर पोलिसांची कारवाई, ११ जणांना घेतले ताब्यात, तीनजण फरार
शिरपूर/थाळनेर : तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी थाळनेरसह मांजरोद, नांथे परिसरात जुगार खेळणाऱ्यांवर धाडी टाकल्या..दोन वेगवेगळ्या टाकलेल्या धाडीत सुमारे सव्वालाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे़ दरम्यान, दोन्हीं धाडीत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून अंधाराचा फायदा घेत ३ जण फरार झाले आहेत़
थाळनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मांजरोद गावातील नवीन प्लॉट जवळील काटेरी झुडपात काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जुगार खेळणारे सुकलाल आनंदा कोळी, मुकूंदा भिवसन शिरसाठ, विजय दगडु आखडमन, दिलीप धोंडु कोळी, कपिल नरेंद्र राजपूत, दिलीप रजेसिंग राजपूत, भागवत भिला भिल (सर्व रा.मांजरोद) यांना जुगार खेळतांना रंगेहात पकडले़ त्यांच्याकडून ३१ हजार ६०० रूपये रोख व मोटर सायकलसह जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले़
९ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास नांथे शिवारात असलेल्या फॉरेस्टच्या वनीकरणात काटेरी झाडाझुडुपात राकेश शिरसाठ, मोहन भिल, गुलाब भिल, मनोहर पाटील, राजु कोळी, सुनिल चैत्राम पाटील, अशोक रावा पाटील, गनी भिका बागवान, रमेश पाटील रा.वढोदा चोपडा हे ९ जण जुगार खेळत असतांना पकडले.
त्यांच्याकडून मोटार सायकल, मोबाईल व रोकडसह असा एकूण ९७ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला़ यावेळी २ जण पळून गेले तर उर्वरीत जणांना ताब्यात घेतले़
थाळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी जुगार खेळणाºयांंसह अवैध व्यवसाय करणाºयांवर कठोर कारवाईचे पाऊले उचलली आहेत़ सपोनि साळुंखे हे अवैद्यरीत्या व्यवसायीकांचे कर्दनकाळ ठरले आहेत. परिसरातील अवैध धंदेवाले सळो की पळो झाले आहेत.
दरम्यान पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरूद्धही कारवाई करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केलेली आहे.