धुळ्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा; पोलिस उपअधीक्षकांची कारवाई
By देवेंद्र पाठक | Published: December 9, 2022 10:20 PM2022-12-09T22:20:19+5:302022-12-09T22:21:03+5:30
३३ हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे : आझादनगर आणि शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यावर पोलिस उपअधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांनी शुक्रवारी दुपारी १ वाजता छापा टाकला. यात ८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून २ जण फरार झाला आहे. त्यांच्याकडून ३२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहरात काही ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांच्यासह पथकाने आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आदर्श प्रिटींग प्रेसच्या बाजूला गल्लीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांना पाहून एक जण पळून गेला आहे. तर ७ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून जुगाराची विविध साहित्य आणि १० हजार ४५० रुपये रोख,११ हजाराचे ४ मोबाइल असा एकूण २१ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सलग दुसरी कारवाई धुळे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनाेहर टॉकीज समोर सुरू असलेला जुगाराचा डाव उद्ध्वस्त करण्यात आला. एकाला ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरार झालेला आहे. यात ११ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही कारवाईत ४ माेबाइलसह २१ हजार ८५० रुपये रोख असा एकूण ३२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड,अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपअधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांच्यासह त्यांच्या पथकाने कारवाई केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"