क्रिकेट सामन्यावर बेटिंग करणारा रायगडचा तरूण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By अतुल जोशी | Updated: December 20, 2023 17:45 IST2023-12-20T17:40:25+5:302023-12-20T17:45:02+5:30
धुळे : भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर ॲानलाइन बेटिंग करणाऱ्या एकाला धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री रंगेहात पकडले. ...

क्रिकेट सामन्यावर बेटिंग करणारा रायगडचा तरूण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
धुळे : भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर ॲानलाइन बेटिंग करणाऱ्या एकाला धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री रंगेहात पकडले. नीलेश रामप्रसाद राव (वय २७, रा. आंबेडकरनगर, रायगड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान यामागे एक टोळी असल्याचे उघड झाले.
भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर ॲानलाइन बेटिंग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने शहरातील अग्रसेन पुतळ्यासमोर असलेल्या एका हॅाटेलवर छापा टाकला. त्यावेळी हॅाटेलच्या खोली क्रमांक ११२ मध्ये नीलेश राव हा बेटिंग करताना आढळून आला. त्याच्या दोन मोबाइलमध्ये ॲाल पॅनल नावाने बेटिंग ॲप सुरू होते. उल्हासनगर येथील साथीदारांच्या मदतीने तो ॲानलाइन बेटिंग करत होता. याप्रकरणी पोलिसांनी नीलेश राव याला अटक केली आहे. त्याच्यासह १२ जणांविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.