रेल्वे तिकिटांचा काळाबाजर भोवला, जळगवातील कापड व्यावसियाकाच्या मुलाला अटक

By सचिन देव | Published: April 17, 2023 08:25 PM2023-04-17T20:25:22+5:302023-04-17T20:25:30+5:30

फुले मार्केटमधील प्रकार : ४७ हजार रूपयांची तिकीटे जप्त

Railway ticket black market, Jalgaon textile businessman's son arrested | रेल्वे तिकिटांचा काळाबाजर भोवला, जळगवातील कापड व्यावसियाकाच्या मुलाला अटक

रेल्वे तिकिटांचा काळाबाजर भोवला, जळगवातील कापड व्यावसियाकाच्या मुलाला अटक

googlenewsNext

धुळे : शहरातील फुले मार्केटमध्ये अलिशान रेडिमेड कापड दुकानात वडिलांसोबत व्यवसाय करणाऱ्या तरूणाने या ठिकाणी रेल्वे तिकीटांचा काळाबाजार देखील सुरू केला.बेकायदेशीर रित्या या तरूणाने आयआरसीटीसीचा युझर आयडी तयार करून, प्रवाशांकडुन जादा पैसे घेऊन तिकीटांची दलाली सुरू केली होती. या प्रकरणी

रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या पथकाने रविवारी रात्री साडेदहा वाजता फुले मार्केट मध्ये या तरूणाला तिकीटांची विक्री करतांना रंगेहाथ अटक केली आहे. जयेश अनिलकुमार आर्य (वय २१, रा. गणपती नगर,जळगाव) असे या तरूणाचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीचा अधिकृत परवाना असलेल्या नागरिकांनाच तिकीट विक्री करण्याचा अधिकार आहे. मात्र, जयेश आर्य हा तरूण बनावट पद्धतीने आयआरसीटीसीचा युझर आयडी तयार करून रेल्वेचे तिकीट काढुन होता. ईतकेच नव्हे तर आरक्षित तिकीट प्रवाशांकडुन ५० ते १०० रूपये जादा घेऊन विक्री करत होता.

गेल्या वर्षभरापासुन जयेश हा अशा प्रकारे बेकायदा तिकीट विक्रीचा काळाबाजार करत असल्याचा संदेश रेल्वे सुरक्षा बलाच्या सायबल सेलतर्फे भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाकडे प्राप्त झाला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक शिवपुजन सिंह, पोलीस नाईक परिक्षित वानखेडे, विनोद जेठवे व किरण पाटील यांनी जयेशच्या फुले मार्केटातील दुकानावर धाड टाकुन त्याला अटक केली आहे. त्याच्याकडुन मोबाईल, लॅपटॉप व आरक्षित असलेले सुमारे ५० ते ६० प्रवाशांचे  सुमारे ४६ हजार ६९८ रूपये किंमतीचे तिकीटे जप्त केली आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे तिकीट दलालांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Railway ticket black market, Jalgaon textile businessman's son arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.