पावसाने जीर्ण इमारतील कोसळली ; प्राणहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:22 PM2019-09-03T12:22:01+5:302019-09-03T12:22:21+5:30
महापालिका : शहरातील र्जीण इमारतीचा प्रश्न ऐरणीवर
धुळे : शहरातील धोकादायक इमारती दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेकडून या इमारतींबाबत कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याने रविवारी झालेल्या पावसाने दोन इमारती कोसळल्या, सुदैवाने यात कोणतीही प्राणहाणी झाली नाही़
शहरात तब्बल १०५ धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. जुने धुळे, पेठ भाग व अन्य काही परिसरांमध्ये इंग्रजकालिन इमारती आहेत़ त्यापैकी बहुतांश इमारतींची बांधकामे १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाली आहेत़ त्यापैकी बहुतांश धोकादायक इमारतींमध्ये नागरिकांचा रहिवास आहे. पावसाळ्यात वादळी वारे व मुसळधार पाऊस झाल्यास धोकादायक इमारती कोसळल्यास वित्त व जीवितहानीदेखील होऊ शकते़
नोटीस बजावण्याचे कार्य
दरवर्षी अधिनियम १९४९ मधील इमारतीसंबंधी अधिनियम २६४ (१) नुसार जीर्ण धोकादायक इमारतींना महापालिका प्रशासनाकडून नोटिसा बजाविणे क्रमप्राप्त आहे. या नोटिसा मिळाल्यानंतर इमारतीच्या मालकाने त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करून मनपाकडे सादर करून त्यावर पुढील कार्यवाही केली जाऊ शकते. मात्र केवळ दरवर्षी नोटीस बजावण्याच्या मनपा कोणतीही भुमिका घेत नसल्याने जीर्ण इमारतीचा प्रश्न एैरणीवर आला आहे़
अशा घडल्या घटना
बºयाच दिवसांच्या विश्रातीनंतर रविवारी सायकांळी मुसळधार पाऊस झाला़ त्यामुळे अनेक वसाहतीमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे़ याच रात्री जुन्या धुळ्यातील ग़नं़ ७ मधील भोईवाडा परिसरात राहणारे जयवंत मानिक खैरनार हे एका कापड दुकानावर कामाला आहे़ रविवारी झालेल्या पाऊसाने घराची भिंत खचत असल्याचा भास झाल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घरातील सदस्यांना बाहेर काढले़ ही घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़
दुसºया घटनेत देवपूर येथील गोराबा काका कुंभार खुंट परिसरातील डॉ़पावसकर व जैन यांच्या मालकीची र्जीण रिकामी इमारत आहे़ रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास इमारतीचा भिंत कोसळली़ सुदैवाने दोन्ही घटनेत प्राणहाणी जरी झाली नसली तरी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे