संततधार पावसामुळे घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:37 PM2019-08-13T23:37:33+5:302019-08-13T23:38:03+5:30
कापडणे : महसूल विभागाकडून पंचनामे, नुकसानग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे येथे संततधार पावसामुळे मातीच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झालेले आहे. महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या आठवडाभरात संततधार पावसामुळे गावातील मातीच्या घरांची मोठया प्रमाणात पडझड होऊन नुकसान झालेले आहे. बºयाच दिवसानंतर पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे. मात्र, संततधार पावसामुळे येथील घरांची मोठया प्रमाणात पडझड झालेली आहे.
पडझड झालेल्या घरांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.
येथील रमेश यादव पाटील, नथू काशिनाथ सोनार, प्रकाश बाबुराव माळी, भटू साहेबराव पाटील (खैरनार), प्रताप साहेबराव पाटील यांच्या घरांचे पावसामुळे नुकसान झालेले आहे. येथील तलाठी विजय बेहेरे व कोतवाल रवींद्र भामरे यांनी घटनास्थळाचे पंचनामे केले असून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पावसामुळे धाब्याची घरे पडत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.