पाऊस, पुरामुळे भाज्याचे दर कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 10:19 PM2019-08-11T22:19:17+5:302019-08-11T22:19:54+5:30

आवक घटली : अतिवृष्टीने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान :

Rain, floods reduced vegetable prices | पाऊस, पुरामुळे भाज्याचे दर कडाडले

dhule

Next

धुळे : जिल्ह्यात होणाºया अतिवृष्टी आणि नदीला आलेल्या पुरामुळे पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम बाजारात भाजीपाल्याच्या आवकवर झालेला आहे. त्यामुळे सर्वच भाज्यांचे दर दुपट्टीने वाढले आहेत.
यावर्षी जिल्ह्यात पावसाने कहर केला. खरीप पिकांचे नुकसान झाले, त्याप्रमाणेच भाजीपाल्याचेही नुकसान झाले. अतिपावसामुळे अनेक ठिकाणी हिरवा भाजीपाला सडला. या सर्व गोष्टींचा आवकवर मोठ्या परिणाम जाणवू लागला आहे. धुळे शहरात सोनगीर, कापडणे, मनमाड, नंदगाव, नाशिक, चांदवड या परिसरातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. येथील कृउबात दररोज ३० ते ३५ मिनीडोअरमधून भाज्यांची आवक होत असते.
दोन-तीन क्विंटलमध्येच आवक
बाजारात पोकळा, गवाळ, मेथी, कारले, गिलके, वाल यांची प्रत्येकी फक्त दोन-दोन क्विंटलच आवक झालेली आहे. सर्वाधिक जास्त आवक हिरवी मिरचीची (२० क्विंटल) आवक झालेली आहे. त्या खालोखाल गड्डा कोबीची १० क्विंटल आवक झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली़
हलक्या प्रतीचा माल
पावसाचा फटका भाजीपाल्याला बसला आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा हलक्या प्रतीचा माल येत आहे. त्यामुळे हा माल टिकवायचा कसा? असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. घाऊक बाजारात दर बºयापैकी असतांना किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहे.
भाज्या व कंसात प्रतिकिलोचे दर
साधी मिरची (४०), सिमला मिरची (६०), बीट (९०), फ्लॉवर (५०), वाल (४०), काकडी (३०), मेथी (६०), वांगे (४०), पोकळा (६०), टमाटे (३०), कोथिंबीर (१३०), गावरान लसूण (१६०), साधा लसूण (८०) असे भाज्याचे दर आहेत़

Web Title: Rain, floods reduced vegetable prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे