नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीने लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 09:33 PM2019-12-29T21:33:29+5:302019-12-29T21:34:03+5:30

बंदला समिश्र प्रतिसाद : हिंदूत्ववादी संघटनांनी नोंदविला सहभाग

The rally attracted attention in support of the Citizenship Act | नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीने लक्ष वेधले

Dhule

Next

धुळे : केंद्र शासनाच्या ‘एनआरसी’ व ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ शहरातील हिंदूत्ववादी संघटनांतर्फे रविवारी विराट तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीत तरूणांनी हातात घेतलेल्या १५० मीटरच्या ध्वजाने शहरवासियांचे लक्ष वेधले होते.
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, भाजप यांच्यासह शहरातील हिंदूत्ववादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीची सुरूवात मालेगावरोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली़ ही रॅली पाच कंदील चौक, आग्रारोड, जुन्या मनपाजवळ पोहचली.तेथे फटाके फोडून रॅलीचे स्वागत करण्यात आले़ त्यानंतर महापालिकेच्या नूतन इमारतीकडून क्युमाईन क्लबमार्गे रॅली जेलरोडवर पोहचली. तेथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत सहभागी झालेल्या युवकांनी विविध घोषवाक्य असलेले फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. याशिवाय युवकांनी १५० मीटर लांबीचा तिरंगा झेंडा ध्वज धरला होता. या ध्वजाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल चार तास ही रॅली सुरू होती.
यावेळी संघटनेचे प्रचारक दत्ता बागुल यांनी एनआरसी व सीएए कायद्याबाबत मार्गदर्शन केले. बागूल यांनी केंद्र शासनाच्या बिलाचे समर्थन करुन त्याविरोधात अपप्रचार केली जात असल्याची टीका त्यांनी केली. या समर्थनार्थ रॅलीत खासदार डॉ़ सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अपंळकर, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, बबन चौधरी, हिरामण गवळी, देवेंद्र सोनार, भिकन वराडे, विजय पाच्छापूरकर, नगरसेवका प्रतिभा चौधरी, भारती माळी, संजय शर्मा आदी सहभागी झाले होते़
व्यापाऱ्यांनी ठेवले दुकाने बंद
कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत व्यापाऱ्यांनी दुकाने, व्यवसाय बंद ठेवून ते सहभागी झाले होते. त्यामुळे शहराची बाजारपेठ ठप्प झाली होती. दुपारी रॅली संपल्यानंतर व्यवहार पूर्ववत सुरूझाले.

Web Title: The rally attracted attention in support of the Citizenship Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे