नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:10 PM2019-12-27T22:10:53+5:302019-12-27T22:11:10+5:30

शिरपूर : हजारो नागरिक सहभागी, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

 Rally in support of citizenship law | नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

Dhule

Next

शिरपूर : केंद्र शासनाच्या सुधारीत नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ शहरात विविध संघटनेतर्फे घोषणा देत रॅली काढण्यात आली़ रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते़
२७ रोजी दुपारी येथील बसस्टॅण्डजवळील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयापासून रॅलीचा प्रारंभ झाला़ ही रॅली मेनरोड मार्गाने प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आल्यानंतर प्रांताधिकारी डॉ़विक्रम बांदल व तहसिलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले़ रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात ‘सीएए’च्या समर्थनाचे फलक झळकावत घोषणाबाजी केली़ ‘वंदे मातरम्’,‘ भारत माता की जय’, ‘जयहिंद’ यांसारख्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी नागरिकत्व कायद्याचे समर्थन केले़ हा कायदा राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य आहे़ कायदा कोणत्याही धर्माच्या विरूध्द नाही़ पाकिस्तान, अफगणिस्तान व बांगलादेशातील हिंदू, बौध्द, शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी धर्मातील अल्पसंख्यक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देणारा हा कायदा आहे़ मात्र या कायद्याबद्दल अपप्रचार करण्यात येत आहे़ या कायद्याला असंवैधानिक पध्दतीने विरोध करून जाळपोळ, दगडफेक व राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशांकडून नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही शासकीय लाभ देवू नये अशी मागणी करण्यात आली आहे़
रॅलीत आमदार काशिराम पावरा, उद्योगपती तपनभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, किविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ़तुषार रंधे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, अ‍ॅड़सुहास वैद्य, अ‍ॅड़अमित जैन, अ‍ॅड़शांताराम महाजन, सुभाष कुलकर्णी, नितीन गिरासे, डॉ़किशोर राठी, नरेंद्र पटेल, महेश लोहार, डॉ़मनोज निकम, डॉ़सुधीर भदाणे, डॉ़सचिन पाटील, डॉ़योगेश जाधव, राजेंद्र भंडारी, कैलास अग्रवाल, युवराज जैन, सुनिल सुर्यवंशी, शशिकांत चौधरी, हेमराज राजपूत, रोहित शेटे, जितेंद्र शेटे, विक्की चौधरी, नितीन बाविस्कर, नरेश डेमराणी, राजु धमाणी, अनिल कटारीया, सुनिल पाटील, महेंद्र पाटील, तुषार जाधव, छगन गुजर, भटू माळी, पंकज बाविस्कर, शामकांत ईशी, संगीता देवरे, डॉ़नलिनी राठी यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

Web Title:  Rally in support of citizenship law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे