वासखेडी येथे दारूबंदीसाठी भरपावसात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2017 01:08 PM2017-07-07T13:08:30+5:302017-07-07T13:08:30+5:30
मोर्चात नागरिकांसह विद्याथ्र्याचाही मोठा सहभाग
Next
>ऑनलाईन लोकमत
धुळे , दि.7 - साक्री तालुक्यातील वासखेडी येथे अवैध धंदे व दारू विक्रीविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाले.
नंदू नेरकर यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. याबाबत निजामपूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. दारू तयार करण्यासाठी लागणा:या वस्तू गावातून सर्रासपणे विक्री होत असून गावात व आजूबाजूच्या परिसरात दारू उत्पादित करून विक्री केली जाते. तसेच बाहेरून दारू विक्रीसाठी आणली जाते. यामुळे गावातील तरुण आणि अल्पवयीन मुले दारूच्या व्यसनात पूर्णपणे बरबाद होत आहेत. घरातील तरुण मंडळी दारूपिऊन आल्यानंतर मोठय़ा प्रमाणात कुटुंबात वादविवाद होत असून महिलांना व मुलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे गावात मोठय़ा प्रमाणात अशांतता निर्माण होत आहे.
याबाबत त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नंदू नेरकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी महिला व मुलांसह मोर्चा काढला. याबाबत निजामपूर पोलीस स्टेशनसह साक्री तहसीलदार व जिल्हाधिका:यांना निवेदने पाठविण्यात आली आहेत.