राम जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:06 PM2019-04-12T22:06:20+5:302019-04-12T22:06:53+5:30
आकर्षक रोषणाई : पारंपरिक पध्दतीने होणार उत्सव साजरा
धुळे : रामनवमीनिमित्त शनिवार १३ एप्रिल रोजी शहरातील विविध मंदिरांमध्ये भगवान प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त सर्वच श्रीराम मंदिरांमध्ये जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यासह शहरातील अनेक मंदिरांना शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. यंदाही तेथे पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. या निमित्त राम मंदिरांसह अन्य मंदिरांवरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
आग्रारोडवरील राममंदिर
जुन्या आग्रारोडवरील पट्टाभिषिक्त श्रीराम मंदीर संस्थानास अनेक वर्षांची परंपरा आहे. येथे गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत रामाचे नवरात्र साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त सकाळी ७ वाजता सर्वसमावेशक भजनी मंडळाचा कार्यक्रम होत आहे.
सुभाषनगरातील राममंदिर
जुने धुळ्यातील सुभाष नगरात असलेल्या राम मंदिरातही राम जन्माचा सोहळा साजरा होणार आहे. सकाळी १० ते १२ यावेळेत विविध धार्मिक कार्यक्रम व १२ वाजता राम जन्मोत्सव साजरा होईल.त्यानंतर तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होईल.
किर्तन सप्ताह
नकाणे रोडवरील राम मंदिरात सालाबादाप्रमाणे श्रीराम नवमीनिमित्त हरिनाम किर्तनी सप्ताह आयोजितक केला आहे़ तरी ७ ते १४ एप्रिल या कालावधी विविध महाराष्ट्रातील सुप्रसिध्द किर्तनकारांचे किर्तन होत आहे़
१३ एप्रिल रोजी हभप़ सोनटक्के महाराज तर १४ रोजी हभप विवेक महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे़ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे़