धुळ्यातील देवपूर भागातील ‘रामनगर जलकुंभ’ परिसर समस्येंच्या गर्तेत़़़!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:20 PM2020-07-19T22:20:28+5:302020-07-19T22:20:57+5:30

महापालिका : प्राण्यांचा मुक्त संचार, गवताच्या प्रमाणात वाढ, आरोग्याचा प्रश्नही गंभीर

The 'Ramnagar Jalkumbh' area in Devpur area of Dhule is in the pit of problems! | धुळ्यातील देवपूर भागातील ‘रामनगर जलकुंभ’ परिसर समस्येंच्या गर्तेत़़़!

धुळ्यातील देवपूर भागातील ‘रामनगर जलकुंभ’ परिसर समस्येंच्या गर्तेत़़़!

Next

धुळे : वाडीभोकर रोडवरील रामनगरात असलेल्या जलकुंभ परिसर विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे़ गवत मोठ्या प्रमाणावर वाढले असून मच्छरांचा त्रास होत आहे़ डुकरांसह कुत्र्यांचा मुक्तसंचार आहे़ याठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याने सर्वकाही आलबेल असल्याचे समोर येत आहे़
वाडीभोकर रोडवर रामनगरात जलकुंभ आहे़ या जलकुंभाच्या माध्यमातून परिसरातील कॉलन्यामध्ये पाणीपुरवठा केला जातो़ पण, पाणी गळतीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डबके साचलेले आहे़ परिणामी मच्छरांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे़ गवताचेही प्रमाण आता मोठ्या प्रमाणावर झालेले आहे़ याकडे महापालिका प्रशासनाला बघायला वेळ नाही़
तसेच जलकुंभ आवारात हायमास्ट लावण्यात आला होता़ पण, तो गेल्या कितीतरी दिवसांपासून बंदच आहे़ त्यामुळे रात्रीच्यावेळेस या भागात वावरणे जिकरीचे झाले आहे़ नियमित स्वच्छता होत नाही़ डुकरे आणि कुत्रे मोकाटपणे जलकुंभाच्या आवारात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे़ या समस्यांकडे अनिल गोटे यांनीही लक्ष वेधले होते़
सुरक्षा रक्षकाची गरज
रामनगर जलकुंभाच्या ठिकाणी केवळ व्हॉलमन आहेत़ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र आहे़ कोणीही या, कोणीही जा अशी स्थिती आहे़ सुरक्षा रक्षक राहिल्यास वचक निर्माण होऊ शकतो़

Web Title: The 'Ramnagar Jalkumbh' area in Devpur area of Dhule is in the pit of problems!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे