धुळे जिल्ह्यात कुसुंबा येथे रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:22 PM2019-09-26T13:22:08+5:302019-09-26T13:22:33+5:30
शरद पवार, अजित पवारांविरूद्ध गुन्ह्याचा तीव्र निषेध
धुळे : राज्य सहकार बॅँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केल्या प्रकाराचा जिल्हा राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे तालुक्यातील कुसुंबा येथील राष्टÑीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात येऊन निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.
राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कुसुंबा येथे झालेल्या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील, कुणाल शिंदे, रोशन शिंदे, विकासो चेअरमन जगदीश रायते, उपसरपंच सुधाकर जाधव, पंचायत समिती सदस्य भगवान भिल, डॉ.पंकज शिंदे, जगदीश शिंदे, रवींद्र बडगुजर आदींसह बहुसंख्येने कार्यकर्ते, ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले. सुमारे अर्धा तास हे आंदोलन चालले. पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर शांततेत पार पडलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.