शिंदखेडा येथे थुंकण्याच्या कारणावरून रसवंती चालकास जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:58 AM2019-12-04T11:58:50+5:302019-12-04T11:59:15+5:30
२० हजार लांबविले, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
आॅनलाइन लोकमत
शिंदखेडा (जि.धुळे) :थुंकण्याच्या कारणावरून रसवंती चालकास दोघांनी जबर मारहाण करून त्याच्या खिशातून बळजबरीन े२० हजार रुपये काढून घेतल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता बसस्टॅड जवळील स्टेशन रोडवरील एम येस महाजन रसवंतीत घडली. याप्रकरणी दोघांविरूद्ध मारहाणसह लुटीचा गुन्हा करण्यात आला.
येथील स्टेशनरोड लगत सुदाम सखाराम माळी यांचे एम एस महाजन कोल्ड्रिंक्स & रसवंती दुकानं आहे. मंगळवरी सकाळी १० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी आकाश सोनवणे (नाट्या) रा. सिद्धार्थ नगर शिंदखेडा व पाटण येथील महादेव भिलाटी येथे राहणारा अनिल जगन पिंपळे हे दोघं आले.
ते रसवंतीसमोर थुंकत असतांना येथे थूंकू नका ग्राहकांना त्रास होतो असे माळी यांनी आकाश सोनवणेला सांगितले. याचा राग येवून सुदाम माळी व त्याच्या मुलालाही सोनवणेनी वाईट वाईट शिवीगाळ करून दुकानासमोर गोधळ घातला. या वेळी आजूबाजूच्या नागरिकांनी आरोपीस समजूत घातली मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने फोन लावून त्याचा मित्र अनिल पिंपळे, यास बोलवून घेतले. त्यानेही रसवंतीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोघांनी रसवंती चालकास लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यापैकी एकाने फायटरने डोक्याला मारल्याने, माळी जखमी झाले.त्यांच्या डोक्याला चार टाके पडले. आकाश व अनिल या दोघांनी माळी यांच्या खिशातून २० हजार रुपए बळजबरीने काढून घेऊन तेथून पसार झाले. याबाबत सुदाम माळी यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.त्यावरून वरील आरोपी विरुद्ध मारहाणीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस करीत आहेत.