निजामपूर येथे विठू नामाच्या गजरात रथोत्सवाची मिरवणूक

By admin | Published: July 5, 2017 11:44 AM2017-07-05T11:44:01+5:302017-07-05T11:44:01+5:30

साक्री तालुक्यातील निजामपूर येथे आषाढी एकादशीनिमित्ताने मंगळवारी दुपारी रथोत्सवाची मिरवणूक काढण्यात आली.

Rathhotsav procession in Vishnu Gahan at Nijampur | निजामपूर येथे विठू नामाच्या गजरात रथोत्सवाची मिरवणूक

निजामपूर येथे विठू नामाच्या गजरात रथोत्सवाची मिरवणूक

Next

ऑनलाईन लोकमत

निजामपूर,दि.5 -    साक्री तालुक्यातील निजामपूर येथे आषाढी एकादशीनिमित्ताने मंगळवारी दुपारी रथोत्सवाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत विठू नामाचा गजर केला.  
यंदा रथोत्सवाचे 74 वे वर्ष होते. इ. स. 1943 मध्ये ह.भ.प.मुरलीधर  उपासनी यांनी हा रथ पारोळा येथील एका कारागिराकडून तयार करून घेतला होता. तेव्हापासून याच रथाची मिरवणूक काढण्यात येते. आषाढी निमित्ताने  येथील विठ्ठल मंदिरात मंगळवारी माध्यान्ह आरती झाली. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली. निजामपूरसह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी येथे गर्दी केली. याप्रसंगी शिवसेनेचे भैया गुरव, आई तुळजाभवानी व्यायामशाळा व जय श्रीराम व्यायामशाळेतर्फे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना केळीचा प्रसाद वाटप करण्यात आला. मंगळवारी दुपारी साक्रीचे तहसीलदार संदीप भोसले यांनी सप}ीक रथपूजा केली. त्यानंतर पांडुरंग व रुख्मिणी यांची मूर्ती रथात विराजमान करून मिरवणुकीस सुरुवात झाली.मिरवणुकीत ह.भ.प. राया उपासनी, अच्युतानंद महाराज, नाथ महाराज, राजू महाराज यांचीही उपस्थिती होती. रथयात्रेला निजामपूर गावातील विठ्ठल मंदिरापासून सुरुवात झाली. त्यानंतर ही मिरवणूक मेन रोडवरून भावसार गल्ली चौक, दत्त मंदिर चौकमार्गे पुन्हा मंदिरार्पयत आली. तेथे मिरवणुकाचा समारोप झाला. 

Web Title: Rathhotsav procession in Vishnu Gahan at Nijampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.