Video: रावसाहेब दानवेंच्या भाषणावरुन दोन गटांत वाद, आमदारास भाषण करताना रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 12:27 AM2018-11-11T00:27:04+5:302018-11-11T00:27:16+5:30
भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी सायंकाळी जेबीरोडवर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
धुळे : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार अनिल गोटे हे व्यासपीठावर जाऊन पोहचले. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापूर्वीच त्यांनी भाषण करण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे, अखेर आमदार गोटेंना भाषण न करताच काढता पाय घ्यावा लागला.
भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी सायंकाळी जेबीरोडवर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात, संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांचे भाषण संपताच आमदार अनिल गोटे यांचे आगमन झाले़ त्यांनी व्यासपीठावर येऊन प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याशी काहीशी चर्चाही केली़ परंतु त्यानंतर दानवे हे मार्गदर्शनासाठी उभे राहण्यापूर्वीच गोटे यांनी माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांनी खुर्च्या फेकत जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे आमदार गोटे यांना काढता पाय घ्यावा लागला.